Home /News /lifestyle /

Women Psychology: ...म्हणतात की स्त्रीचं मन कळत नाही! असं काही नसतं या 5 गोष्टींनी खरं समजून घ्या

Women Psychology: ...म्हणतात की स्त्रीचं मन कळत नाही! असं काही नसतं या 5 गोष्टींनी खरं समजून घ्या

Women Psychology: आज आपण महिलांशी संबंधित 5 मनोवैज्ञानिक तथ्यांबद्दल (Psychological facts) सांगणार आहोत, ज्या जाणून घेतल्यावर महिलांशी संबंधित 'मोठे रहस्य' (Women Psychology) उलगडेल.

    नवी दिल्ली, 29 जानेवारी : असे म्हटले जाते की, स्त्रीला समजून घेणं हे अनेकांसाठी विशेषत: पुरुषांसाठी खूप कठीण काम आहे. अनेक लोकांचा असाही विश्वास आहे की आजपर्यंत कोणीही मुलगी किंवा स्त्रीला पूर्ण समजून घेऊ शकलेली नाही. कित्येक पुरुष ते ज्या स्त्रीसोबत रिलेशनशिपमध्ये (Relationship) आहेत, तिलाही पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. पण, हे काम खरंच तितकं अवघड आहे का? जेवढं याविषयी बोललं जातं गृहीत धरलं जातं? खरं तर स्त्रीला समजून घेणं तिचा मूड समजून घेणं हे अशक्य काम नाही. तुम्हालाही महिलांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्याशी संबंधित काही मानसिक (Psychological) गोष्टी जाणून घ्याव्यात. आज आपण प्रेमळ महिलांशी संबंधित 5 मनोवैज्ञानिक तथ्यांबद्दल (Psychological facts) सांगणार आहोत, ज्या जाणून घेतल्यावर महिलांशी संबंधित 'मोठे रहस्य' (Women Psychology) उलगडेल. प्रेमळ स्त्रियांबद्दल मानसशास्त्र काय म्हणते? (Psychological facts related to women in love) medium.com कडून मिळालेल्या माहितीनुसार, जर एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल, तर ती तुमच्याकडून अशी अपेक्षा करत असते की, तुमच्या हृदयात तिचं महत्त्व इतर कोणत्याही स्त्रीपेक्षा जास्त असायला हवं. म्हणजेच तुम्ही तुमच्या पार्टनरवर इतकं प्रेम करा की तिला असं वाटू द्या की तीच तुमच्यासाठी खास आहे आणि तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. फिल्मी स्टाईलमध्ये सांगायचे झाल्यास महिलांना त्यांच्या पार्टनरच्या मनावर एकट्याने राज करायचे असते. महिलांच्या प्रेमाशी संबंधित मानसशास्त्रानुसार, त्या आपल्या जोडीदाराला कधीही विसरत नाहीत. ती नेहमी फक्त तिच्या प्रियकराचाच विचार करते. जर तुमची लव पार्टनर तुम्हाला मेसेज किंवा कॉलद्वारे सांगत असेल की ती तुम्हाला मिस करत आहे. तर ती तुम्हाला संपूर्ण वेळ मिस करत असते. अशावेळी तुम्हीही तिला विश्वास द्यायला हवा की, तुम्हीही तिच्यावर किती प्रेम करता आणि तिची तुम्हाला सतत आठवण येत असते. हे वाचा - Relationship Tips : चांगल्या वैवाहिक जीवनासाठी तुमच्या जोडीदारासोबत या गोष्टी करू नये शेअर अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा स्त्रिया त्यांना नेमके काय वाटते हे सांगत नाहीत, उलट सांगतात, म्हणजेच त्यांची तब्येत बरी नसली तरीही त्या बरी असल्याचे सांगतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे पार्टनर गोंधळून जातात. वास्तविक, असे घडते कारण बहुतेक प्रेमळ स्त्रिया त्यांच्या भावना आणि इच्छा व्यक्त करण्यास संकोच करतात. तिची इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिच्या भावना स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि तिने न सांगितल्या तरीही तिचे मन समजून घ्यावे. स्त्री प्रेमाच्या मनोवैज्ञानिक पैलूनुसार, अनेक स्त्रिया प्रेमात असतात तेव्हा त्या लहान मुलांप्रमाणे वागतात आणि त्यांना असं वाटत असतं की, जोडीदारानं आपल्याशी प्रेमानं बोलावं. म्हणून जेव्हा त्या कधी उदास दिसतात तेव्हा तुम्ही तिचे लाड करा. तिची प्रेमानं विचारपूस करा, तसं करणं अवघड नाही. हे वाचा - Relationship : या गोष्टींवरून ओळखा तुमचं प्रेम, नातं एकतर्फी तर नाही ना? असे पडू शकाल बाहेर बरेच पुरुष हे मान्य करतात की जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा त्यांचा जोडीदार नक्कीच त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारतो, जसे की 'मी आज वेगळी दिसत आहे का?' हे नवीन केस कापल्यानंतर, मेकओव्हर केल्यानंतर किंवा नवीन ड्रेस घातल्यानंतर होते. अनेक मुली विचारतात. वास्तविक, महिलांना हेअरकट, कपडे किंवा लिपस्टिक शेड यांसारख्या छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये केलेल्या बदलांमध्ये जास्त रस असतो. मानसशास्त्रानुसार, जर तुम्ही त्यांच्या बदलांकडे लक्ष दिले, त्यांच्यात रस असेल तर त्यांना ते आवडते. हे वाचा - Happy Life: वैवाहिक जीवनाचा तुम्हालाही कंटाळा आलाय का? नात्यातील गोडवा असा परत मिळवाल या काही साध्या सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करू शकता किंवा तुमच्या क्रशला प्रभावित करू शकता. तसेच, तुम्ही हेही लक्षात ठेवावे, की महिला आणि पुरुषांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची पद्धत वेगळी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Relationship, Relationship tips, Woman

    पुढील बातम्या