मुंबई, 24 जानेवारी : गर्भधारणेदरम्यान गर्भपात किंवा मिसकॅरेज केवळ स्त्रीच्या शरीरालाच हानी पोहोचवत नाही तर तिला मानसिक आघात देखील होतो. कधीकधी ही भावनात्मक जखम इतकी खोल असते की, ती तणाव आणि नैराश्यातून स्वतःला बाहेर काढू शकत नाही. अशा परिस्थितीत घरातील वातावरण आणि जोडीदाराची संगत असणे अत्यंत आवश्यक आहे.
गर्भपात झाल्यानंतर स्त्रियांना अनेक नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो आणि यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत तिला जोडीदार आणि कुटुंबीयांचा भावनिक आधार मिळाला नाही तर ती स्त्री जास्त खचू शकते आणि निश्चितच हे तिच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
गरोदरपणात उसाचा रस पिण्याचे फायदे आणि नुकसान, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
द हेल्थशॉटच्या मते, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, गर्भपातानंतर अनेक स्त्रिया पोस्ट-ट्रॉमॅटिक तणाव, नैराश्य आणि चिंताग्रस्त असतात आणि त्यातून बरे होण्यासाठी 9 महिने लागू शकतात. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांनी महिलेची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योग्य काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे. गर्भपात झाल्यानंतर स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची कशी काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
अशा प्रकारे गर्भपात झालेल्या महिलेची घ्या काळजी
आरोग्याची काळजी घ्या
गर्भपातानंतर बरे होण्यासाठी स्त्रीने तिचे हायड्रेशन, आहार, व्यायाम, झोप इत्यादींची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. पण जर ती स्त्री हे करू शकत नसेल तर तुम्ही तिला मदत केली पाहिजे आणि तिला स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
जोडीदाराची साथ
बऱ्याच जोडीदारांना वाटते की, यावर चर्चा केल्याने ते तिला आणखी दुखावतील. पण काही वेळा योग्य संवादाअभावी समस्या आणखी वाढतात. म्हणूनच तुम्ही स्त्रीला न दुखावता तिच्याशी संतुलित वागा आणि तिच्याशी संभाषण सुरू ठेवा.
वेळ द्या
कुटुंबातील सदस्यांसाठी देखील हा एक कठीण काळ आहे. परंतु गर्भपात झाल्यानंतर भावनिकरित्या बरे होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. हे समजून घेणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे घाई करू नका. महिलेला यातून बाहेर पाडण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy, Women