क्लीन शेव की बियर्ड लुक? मुलींना सगळ्यात जास्त काय आवडतं?

क्लीन शेव की बियर्ड लुक? मुलींना सगळ्यात जास्त काय आवडतं?

दाढी ठेवणं ही आता फॅशन झालीय. देशभर याचा ट्रेंन्ड सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जानेवारी: आजकाल तरुणांमध्ये आणि पुरुषांमध्ये दाढी वाढवण्याचा नवा ट्रेण्डच आला आहे. बॉलिवूडपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत अनेक सेलिब्रिटींपासून दिग्गजांपर्यंत बियर्ड फॅशन फॉलो करताना दिसत आहेत. एका संशोधनातून समोर आलं आहे की दाढी असलेले पुरुष हे जास्त आकर्षक आणि प्रभावी दिसतात. त्यांचं समाजातील स्थान वेगळं असतं. दाढी असणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात. तर दाढी नसलेल्या किंवा क्लीन शेव करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत दाढी ठेवणाऱ्या पुरुषांना स्त्रियांची पसंती अधिक असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

एक हजार महिलांना सोबत घेऊन हे संशोधन करण्यात आलं यामध्ये साधारण 18 ते 70 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील महिलांचा समावेश होता. या संशोधनात त्यांच्या पार्टनरच्या दाढीवरून अनेक प्रश्न महिलांना विचारण्यात आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या दाढीचे 30 फोटो साधारण महिलांना दाखवण्यात आले होते. ही चित्रे पूर्ण दाढी असलेल्या किंवा दाढी असलेल्या लोकांची छायाचित्रे होती.

हेही वाचा-तरुण दिसण्यासाठी नाही कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांची गरज, फक्त खा 'हे' पदार्थ

या संशोधनादरम्यान अनेक स्त्रियांचं म्हणणं होतं की दाढीमुळे पुरूष अधिक रुबाबदार आणि आकर्षक दिसतात. त्यामध्येही बियर्ड दाढी ठेवणारे पुरुष आवडणाऱ्या महिलांचं प्रमाण अधिक असल्याचं लक्षात आलं.

हे पुरुष स्वत:ची खूप काळजी घेतात. स्वत:च्या शरीरासोबतच मनाचीही उत्तम निगा राखतात असं या महिलांचं म्हणणं होतं. त्यांच्या बियर्ड लूकमुळे ते चारचौघांमध्ये अधिक उठून दिसतात. क्लीन शेव करणारे पुरुष आवडणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण तुलनेनं कमी असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. दर काही वर्षांनंतर फॅशन बदलत असते. काही वर्षांपर्यंत 'क्लिन शेव्ह' ही तरुणांमध्ये फॅशन होती. मात्र आता परिस्थिती बदललीय. दाढी ठेवणं ही आता फॅशन झालीय. देशभर याचा ट्रेंन्ड सुरू आहे. ही फक्त भारतातच नाही तर जगभरच फॅशन असल्याचं दिसून येतंय. नीट शेप दिलेली दाढी, पिळदार मिश्या आणि त्यावर ताव मारणारे तरुण दिसणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. पुरुषांच्या या दाढी वाढविण्यावर अमेरिकेत एक संशोधन करण्यात आलंय. त्यात स्त्रियांना दाढीवाले पुरुष आवडतात असं आढळून आलंय.

हेही वाचा-सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणं घातक, 'या' ड्रिंकने करा दिवसाची सुरुवात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2020 08:20 AM IST

ताज्या बातम्या