Home /News /lifestyle /

मासिक पाळीत खूप पोट दुखतं? मग 'हे' पदार्थ सेवन करा

मासिक पाळीत खूप पोट दुखतं? मग 'हे' पदार्थ सेवन करा

मासिक पाळी दरम्यान पुदिन्याचा चहा घेतल्यानेदेखील बराच आराम मिळतो. पोटदुखी, मळमळ आणि गॅस इत्यादी समस्या पुदिन्याचा चहा प्यायल्याने दूर होतात.

    मुंबई, 7 जानेवारी : मासिक पाळी (Periods) ही एक नैसर्गिक प्रकिया आहे. सर्वसामान्यपणे वयाच्या 10 ते 15 व्या वर्षी मुलींना मासिक पाळी येते. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या आहे. त्रासापासून सुटका मिळावी म्हणून महिला यावर औषध घेतात. मात्र, अनेकदा औषधे घेतल्यानंतर सुद्धा ही समस्या सुटत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येक महिलांना प्रचंड वेदना होत असतात. कोणाची कंबर दुखते तर कुणाचे पाय. तसेच काही जणींच्या ओटीपोटीत दुखते. त्यामुळे कामात लक्ष लागत नाही, सतत चिडचिड होते. मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्रास (Period pain) कमी होतो. मासिक पाळीदरम्यान खाण्याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मासिक पाळी दरम्यान पुदिन्याचा चहा घेतल्यानेदेखील बराच आराम मिळतो. पोटदुखी, मळमळ आणि गॅस इत्यादी समस्या पुदिन्याचा चहा प्यायल्याने दूर होतात. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान या गोष्टींचा त्रास होतो. त्यांच्यासाठी पुदिन्याचा चहा पिणे खूप फायदेशीर आहे. याबाबत 'टीव्ही 9 हिंदी'ने वृत्त दिलं आहे. मासिक पाळीत पाणी जास्त प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर हायड्रेट राहते. पण, थंड पाणी पिणे टाळा, कोमट पाणी पिण्याला प्राधान्य द्या. कोमट पाणी प्यायल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो. याशिवाय, मासिक पाळीच्या काळात महिलांनी प्रथिनेयुक्त आहारही घ्यावा. दही, दूध, मांसाहार, अंडी, मासे, अंकुरलेले धान्य इत्यादींचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. हेही वाचा : 3 वर्षे मेहनत करून McDonald’s ने आणला नवा मेन्यू McPlant; खाताच लोक म्हणाले... शरीरात कॅल्शियम खूप आवश्यक असते. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर विविध समस्या होतात. विशेष करून मासिक पाळीच्या काळात शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू देऊ नका. टोफू, ब्रोकोली, दुग्धजन्य पदार्थ, नट्स, डेअरी हाड असणारे मासे खावेत. यामुळे शरीरात भरपूर कॅल्शियम राहते. नाहीतर वेळेपूर्वी सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातून ब्लड लॉस (Bleeding) होतो. जास्त रक्तस्त्राव होणाऱ्या महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. पालक, केळी, भोपळा, बीट इत्यादी लोहयुक्त पदार्थ खाल्ल्याने या समस्यापासून सुटका मिळते. हेही वाचा : 1 महिना दारू न पिल्याने काय परिणाम होतो? वाचून तुम्ही दारूला स्पर्शही नाही करणार मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना आंबट पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण, त्यामुळे अस्वस्था निर्माण होते, असे म्हटलं जातं. तसेच थंड पदार्थ खाण्यासदेखील मनाई करण्यात येते. मासिक पाळीमध्ये महिलांनी फक्त पौष्टिक पदार्थ खावेत. मासिक पाळीच्या दिवसात या गोष्टींची काळजी घेतल्यास वेदनांपासून सुटका मिळू शकते.
    First published:

    Tags: Health, Periods

    पुढील बातम्या