Home /News /lifestyle /

नाजूक भागांसाठी हवं योग्य संरक्षण; अंतर्वस्त्रं खरेदी करताना स्त्रियांनी या गोष्टी तपासल्या नाहीत तर आहे धोका

नाजूक भागांसाठी हवं योग्य संरक्षण; अंतर्वस्त्रं खरेदी करताना स्त्रियांनी या गोष्टी तपासल्या नाहीत तर आहे धोका

अंतर्वस्त्रांची (Lingerie) निवड चुकली तर त्याचा परिणाम थेट स्त्रीच्या आरोग्यावर (Women's health) होऊ शकतो. या नाजूक विषयावर नीट समंजसपणे विचार होण्याची आवश्यक आहे.

  आपल्याकडे अजूनही काही विषय स्त्रियांनी जाहीरपणे बोलायचे नसतात. स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांची (women inner wear guide) दुकानं तर खूप दिसतात, पण त्याबद्दल बोलणं होत नसल्याने योग्य माहिती पोहोचतच नाही. अंतर्वस्त्रांची (Lingerie) निवड चुकली तर त्याचा परिणाम थेट स्त्रीच्या आरोग्यावर (Women's health) होऊ शकतो. या नाजूक विषयावर नीट समंजसपणे बोलणं आवश्यक आहे. नुकताच आपण महिला दिन (Women's Day) साजरा केला यानिमित्तानं आपण महिलांची विविध कर्तृत्व पहिली. यावरून आपल्याला लक्षात आलं. महिला कोणत्याही क्षेत्रात आत्ता मागे नाहीत. मात्र एक गोष्ट मागे पडत आहे. ती म्हणजे महिलांचं आरोग्य. हो या धावपळीच्या जगात महिला अजूनच वेगवान झाल्या आहेत. घरं सांभाळनं, ऑफिस सांभाळनं या धावपळीत महिलांना स्वतः च्या आरोग्याकडे कडे, शरीराकडे लक्ष देणं थोडं कठीण झालं आहे. शरीरासंबंधीच्या एखाद्या जाणीवेला लहान लहान गोष्ट म्हणून दुर्लक्ष केलं जातं. मात्र याच गोष्टी पुढं जाऊन मोठ्या व्याधींना आमंत्रण देतात. स्त्रियांच्या शरीरात ऋतूमानानुसार, काळानुसार अनेक लहान लहान बदल होत असतात. अनेक वेळा खूप लहान गोष्टींचा स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे महिलांच्या अंतर्वस्त्रांची निवड. अनेकांनां ही गोष्ट तितकी महत्वाची वाटणार नाही. मात्र हा विषय खूपचं महत्त्वाचा आहे. अंतर्वस्त्रं खरेदी करताना सर्वसामान्यपणे आपण रंग किंवा त्यांची स्टाइल या आधारावर त्याची निवड करतो. मात्र हे अतिशय चुकीचं आहे. महिलांनी अंडरवेअर खरेदी करताना तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. विविध प्रकारच्या कापडांच्या अंडरवेअर्स उपलब्ध असतात. अनेक महिलांना माहीत नसतं की कोणत्या पद्धतीचं कापड आपल्या शरीरासाठी योग्य आहे. काही विशिष्ट कापडाची अलर्जी असू शकते. त्यामुळे आपल्या योनीचा बाहेरच्या भागाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. काही प्रकारची वस्त्रं दीर्घकाळ वापरण्यासाठी सूटेबल नसतात. स्त्रियांना यामुळे अंतर्गत भागात खाज येणं, जळजळ होणं, आग होण्यासारख्या समस्या भेडसावतात. त्याविषयी उघडपणे बोलताही येत नाही. त्यामुळे आपल्या शरीरासाठी कोणत्या पद्धतीची अंडरवेअर योग्य आहे आणि ते कसं ठरवावं हे ओळखण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी नक्की वाचा... आपल्या अनुकूलतेनुसार अंतर्वस्त्रं खरेदी करा महिलांनी आपली अंडरवेअर किंवा पँटी खरेदी करताना आपल्या त्वचेला आरामदायी वाटेल का याची पडताळणी केली पाहिजे. प्रत्येक महिलांची शरीर रचना वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकीला वेगळ्या पद्धतीच्या अंडरवेअर आरामदायी वाटणार. स्टाइलचा विचार कंफर्टच्या दृष्टीने आधी करायला हवा. त्यामुळे कोणाला हिप्सस्टर्स तर कोणाला बिकिनी कट आरामदायी ठरू शकतो. खरेदी करताना आपल्या शरीराच्या ठेवणीनुसारचं त्याची निवड करा. - अंडरवेअर खरेदी करताना साइझ योग्य आहे का तपासून घ्या. बऱ्याच वेळा आपण लहान साइज वापरणं पसंत करतो. मात्र ते जर आपल्या शरीरचनेपेक्षा लहान आकाराचं असेल तर, तुमच्या अंतर्भागात त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लहान साइजमुळे तुमच्या योनी भागात खाज येणं, इन्फेक्शन होणं किंवा पुरळ उठण्यासारखे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे साइजचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. - जाळीची नक्षी किंवा लेस असणाऱ्या अंडरवेअर वापरणं बऱ्याच महिलांना आवडतं. कधीतरी याचा वापर करणं ठीक आहे. पण नियमित दैनंदिन वापरासाठी ते योग्य नाही. यामुळे तुमच्या अंतर्गत भागावर लाल चट्टे उठणं, आग होणं, वळ उठणं अशा समस्या निर्माण होतात. - त्याचबरोबर सिंथेटिकच्या कपड्यापासून बनलेलं अगदी घट्ट असं अंडरवेअर असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या अंतर्गत भागात खाज होऊ शकते. (हे वाचा: Sexual wellness:केवळ लैंगिक संबंधांसाठी वापर करणाऱ्या पुरुषांमध्ये रस असेल तर?)
  तुमच्या अंतर्गत भागासाठी योग्य अंडरविअर कोणतं आहे?
  महिलांच्या अंतर्गत भागासाठी प्युअर कॉटन पासून तयार करण्यात आलेली अंडरवेअरच योग्य आहे. बऱ्याच महिला नॉयलॉन किंवा सिंथेटिक कापडाची अंतर्वस्त्रं वापरतात. मात्र त्यामुळे तुमच्या अंतर्गत भागात उष्णता निर्माण होणं किंवा ओलसरपणा जाणवणं असे प्रकार घडतात. कॉटन घाम शोषून घेतं. त्यामुळे तेच कापड योग्य.
  तुमच्या अंतर्गत भागासाठी काय अयोग्य आहे-
  सर्वात महत्त्वाचं अतिघट्ट अंतर्वस्त्रं. त्यामुळे अंतर्गत भागात घाम सुटतो आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. तसंच व्यायामानंतर अंतर्वस्त्रं बदलणं आवश्यक आहे. अन्यथा घामामुळे विषाणू संक्रमित होऊन इन्फेक्शन होऊ शकतं.
  अशा पद्धतीने या लहान लहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपल्या अंतर्गत आरोग्यवर होणारे दुष्परिणाम टाळू शकता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Health, Women

  पुढील बातम्या