Home /News /lifestyle /

कॅन्सरमधून वाचली असती पण... 7 वर्षांच्या मुलाला बाथटबमध्ये बुडवून स्वतः घेतला गळफास

कॅन्सरमधून वाचली असती पण... 7 वर्षांच्या मुलाला बाथटबमध्ये बुडवून स्वतः घेतला गळफास

अनेकदा मृत्यूपेक्षाही मरण्याची कल्पनाच माणसाला जास्त बेचैन करते. एका 36 वर्षीय आईचंही नेमकं तेच झालं आणि स्वतःच्या चिमुरड्याला संपवून तिनेही जगाचा निरोप घेतला.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : माणूस अनेकदा मरणाहून जास्त घाबरतो ते मरण्याच्या कल्पनेला! लंडनमध्ये (London) घडलेली ही घटना वाचून कुणालाही हळहळ वाटेल. एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर (breast cancer) झाला. या कॅन्सरमुळे आपला मृत्यू होईल या कल्पनेनंच ती इतकी बेचैन झाली, की तिनं  स्वतःला गळफास लावून घेतला (suicide). हे करण्याअगोदर तिने आपल्या 7 वर्षांच्या मुलालाही बाथ टबमध्ये बुडवून ठार मारलं. रशियात जन्मलेल्या युलिया नावाच्या 36 वर्षीय महिलेनं आजारपणातून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात असं स्पष्ट झालं आहे की, मरणाच्या भयाने तिनेच आधी मुलाला संपवलं आणि मग स्वतःचा जीवही संपवला. आपण आता कॅन्सरनं मरणार ही भावना तिच्या मनात इतकी तीव्र झाली, की तिनं फाशी घेतली. सोबतच 7 वर्षाच्या आपल्या मुलाचाही जीव घेतला. विशेष म्हणजे, डॉक्टरांनी तिला ती वाचण्याची शक्यता तब्बल 97 टक्के असल्याचं सांगितलेलं असतानाही तिनं हे पाऊल उचललं. युलियाच्या आईनं सांगितल्यानुसार, युलिया लग्नापूर्वी अतिशय आनंदी आणि चांगली तब्येत असलेली मुलगी होती. लग्नानंतरच्या तणावातून मात्र ती अस्वस्थ असायची. यातूनच तिचा आजार आणखी गंभीर बनला. युलियाच्या तणावाचा अंदाज यातूनच लावता येतो, की डॉक्टरांनी खात्री दिल्यावरही सतत तिला असं वाटायचं, की ब्रेस्ट कॅन्सरमुळे मरणाऱ्या तीन टक्के लोकांमध्ये आपला समावेश असेल. युलियाच्या आईनं सांगितल्यानुसार, युलियाला मृत्यूचं भय वाटायचं, पण स्थिती इतकी बिघडली, की तिनं स्वतःला संपवलं. काही दिवसानंतरच युलियाच्या ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया होणार होती. युलियाच्या मैत्रिणीने सांगितल्यानुसार, तिच्या घरातून सतत भांडण्याचे आवाज येत असत. यावर्षी तर गोष्टी अजूनच बिघडल्या होत्या. एकदा मी तिच्या घरातून सतत येणाऱ्या मोठ्या आवाजामुळे पोलिसही बोलावले होते. युलियाचा नवरा तेव्हा तिच्यावर ओरडत होता, की तू तुझी इंग्रजी अजून सुधारली पाहिजेस. रिलेशनशिपमधला तणाव, त्यातलं नैराश्य आणि त्या हा आजार हे सगळं युलिया पेलू शकली नाही आणि तिने टोकाचं पाऊल उचललं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Breast cancer, Marriage, Suicide

    पुढील बातम्या