Home /News /lifestyle /

Men’s Fashion tips : New year 2022 मध्ये तिला प्रपोज करायचं ठरवलंय; या ड्रेसिंग स्टाइलनेच ती इम्प्रेस होईल

Men’s Fashion tips : New year 2022 मध्ये तिला प्रपोज करायचं ठरवलंय; या ड्रेसिंग स्टाइलनेच ती इम्प्रेस होईल

New year 2022 Fashion tips for man : पुरुषांचे कोणत्या स्टाइलचे कपडे महिलांसह सर्वांच्या नजरा खिळवून (Men’s right clothing) ठेवू शकतात, याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 01 जानेवारी : महिलांच्या फॅशनबद्दल अनेकदा चर्चा केली जाते. याचं कारण म्हणजे स्त्रिया त्यांच्या फॅशन आणि स्टाइलकडे जास्त लक्ष देतात. तिच्या परफेक्ट लूकसाठी ती डोकं लावत असते. तर, पुरुष वेगळा विचार करतात. पुष्कळ वेळा पुरुषांना फक्त त्यांना आराम देणारे कपडे घालायचे असतात. महिलांप्रमाणे ते त्यांच्या लुकचा विचारही करत नाहीत. पण ही विचारसरणी पुरुषांसाठी (Men’s Fashion tips) नेहमीच योग्य ठरणारी नसते. प्रत्येक वेळी आराम देणारे कपडे तुम्हाला छान दिसत असतीलच असं नाही. मात्र, काही वेळा मुले महिलांवर छाप पाडतील, असे कपडे घालतात. जाणून घेऊ, पुरुषांचे कोणत्या स्टाइलचे कपडे महिलांसह सर्वांच्या नजरा खिळवून (Men’s right clothing) ठेवू शकतात. 1.फंकी सूट पुरुषांच्या पोशाखांसाठी सूट हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि सूटमधील पुरुष देखील सर्वांना आवडतात. परंतु सर्व प्रकारचे सूट चांगले दिसतातच, असं नाही. जर तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल, तर चमकदार रंगांसह फंकी स्टाइल सूट. विशेषत: जर तुम्ही एखाद्या महिलेसोबत जात असाल तर अशा प्रकारचा सूट घालू नका. 2. लो वेस्ट जीन्स लो वेस्ट जीन्सला पुरुषांच्या फॅशनमध्ये स्थान आहे. पण अनेकदा महिलांना पुरुषांची अशा प्रकारची जीन्स आवडत नाही. अशा जीन्स घालणं म्हणजे जास्त स्किन शो केल्यासारखं महिलांना वाटतं. आजच्या काळात स्मार्ट दिसण्यासाठी या फॅशनपासून दूर राहिलं पाहिजे. 3. वनलाइनर टीशर्ट पुरुषांनाही टी-शर्ट घालणं आवडतं. त्यांना ते आरामदायक वाटतं. पण वन-लाइनर टी-शर्ट सर्वांनाच चांगला दिसतो असं नाही. याच्यामुळं तुमचा लुक खराबही होऊ शकतो. हे वाचा - Year Ender 2021 : सुष्मिता सेनपासून आमिर खानपर्यंत, 2021 सालात या 6 सेलिब्रिटींचं ब्रेकअप 4. कॅप्री/शॉर्ट कॅप्री बहुतेकदा उन्हाळ्यात परिधान केली जाते. परंतु, कॅप्री/शॉर्ट हा असा पोशाख आहे, जो पुरुष सहसा आरामासाठी घालतात. पण त्यामुळं तुमचा लुक खराब होऊ शकतो. त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात 5.ल्युमिनस बेल्ट मुलं पँट किंवा जीन्ससोबत बेल्ट वापरतात. मात्र, चमकदार बेल्टमुळं तुमची ड्रेसिंग खराब होऊ शकते. मुलींना चमकदार दिसणारे बेल्ट आवडत नाहीत. त्याऐवजी, तुम्ही फक्त हलका साधा साधा बेल्ट घालावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fashion, Lifestyle

    पुढील बातम्या