काय होतीस तू काय झालीस तू? हेअर डाय लावताय तर सावधान..!

एस्टिला आता रुग्णालयात उपचार घेत आहे. डाॅक्टरांनी डायमध्ये पीपीडी केमिकल असल्यामुळे तिला रिअॅक्शन झालं.

  • Share this:

सुंदर दिसण्यासाठी तरुणी काय काय करतील याचा नेम नाही. घरगुती ते आयुर्वेदिक आणि महागडी प्रसाधन वापरण्यास मागेपुढे पाहत नाही. पण अशाच एका ब्युटी प्रोडक्ट्समुळे एका तरुणीला मोठी किंमत चुकवावी लागली.

 पॅरिसमध्ये राहणारी 19 वर्षीय एस्टिलने आपल्या केसांना रंग लावण्यासाठी हेअर डायचा वापर केला. पण या हेअर डायचा तिच्यावर असा दुष्परिणाम झाला की तिचा चेहराचा बदलला.

 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, एस्टिलने स्थानिक बाजारातून हेअर डाय खरेदी केली होती. नेहमीप्रमाणे तिने डाय लावली पण काही वेळानंतर तिच्या डोक्यात खाज यायला सुरुवात झाली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

 या हेअर डायचा असा परिणाम झाला की ती सकाळी उठली तेव्हा तिचा चेहरा आणि डोक्याची रुपरेषाच बदलून गेली. तिचे डोकं पहिल्यापेक्षा मोठं झालं. तब्बल 63 सेंटीमिटर रूंद डोकं झालं. एवढंच नाहीतर तिची जीभेचा सुद्धा आकार बदलला.

 एस्टिला आता रुग्णालयात उपचार घेत आहे. डाॅक्टरांनी डायमध्ये पीपीडी केमिकल असल्यामुळे तिला रिअॅक्शन झालं. डायमध्ये PPD (Paraphenylenediamin) नावाचं केमिकल होतं. हे जास्त करून सौंदर्य प्रसाधन वस्तूत वापरलं जातं.

 डाॅक्टरांचं म्हणणं आहे की, एस्टिलाने डाय वापरण्याची प्रक्रिया सांगितल्यानुसार वापरली नाही. 48 तासांचा अवधी डाय वापरण्यासाठी दिला होता. पण तिने 30 मिनिटात याचा वापर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 07:38 AM IST

ताज्या बातम्या