Home /News /lifestyle /

OMG! छातीत नाही पाठीवर धडधडतं हदय; बॅगेत आपलं Heart घेऊन फिरते ही महिला

OMG! छातीत नाही पाठीवर धडधडतं हदय; बॅगेत आपलं Heart घेऊन फिरते ही महिला

छातीऐवजी पाठीवर हृदय (Woman heart in bag) हे थोडं विचित्र आहे की नाही?

    ब्रिटन, 16 एप्रिल: हार्ट किंवा हृदय (Heart) कुठे असतं, असं विचारलं तर कुणीही सांगेल छातीत. छातीच्या डाव्या बाजूला हृदय धडधडत असतं. पण एका महिलेचं हृदय मात्र छातीत नाही तर पाठीवर आहे. काय वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? त्यातही आश्चर्य म्हणजे तिचं हृदय पाठीच्या आत नाही तर ती आपल्या पाठीवरील एका बॅगेत आपलं हृदय (Woman heart on back) घेऊन फिरते. म्हणजेच शरीराच्या आत नाही तर बॅगेत तिचं हृदय धडधडतं (Woman heart in bag). हे थोडं विचित्रच नाही का? हे कसं शक्य आहे? जर त्या महिलेच्या छातीत हृदय नाही तर ती जिवंत कशी? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. ही महिला आहे ब्रिटनमधील (Britain). सल्वा हुसैन असं तिचं नाव. सल्वा 39 वर्षांची आहे. सल्वाच्या पाठीवर नेहमी एक बॅग असते. ज्यामध्ये तिचं हृदय असतं. आपल्या पाठीवरच हृदय घेऊन ती फिरत असते. कारण तिला हृदयाची गंभीर अशी समस्या आहे. हे वाचा - याला म्हणतात LUCK! ऑनलाईन ऑर्डर केले Apple आणि डिलिव्हरीत मिळाला iPhone जुलै 2017 साली सल्वाला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तपासणीत तिला हृदयाचा गंभीर आजार असल्याचं समजलं. तिचं हार्ट ट्रान्सप्लांट करणंही शक्य नव्हतं. त्यामुळे आर्टिफिशिअल हृदय हा एकच मार्ग होता. तिच्या कुटुंबाच्या परवानगीनुसार सल्वाचं खरं हृदय काढण्यात आलं आणि त्याऐवजी तिच्या पाठीवर एक कृत्रिम प्रत्यारोपणमार्फत स्पेशल युनिट बसवण्यात आलं. तेव्हापासून सल्वाच्या पाठीवर ही बॅग असते. ज्यात तिचं कृत्रिम हृदय असतं.  या बॅगेत बॅटरीवर चालणारं एक पंप, इलेक्ट्रिक मोटर आहे.  या बॅगला दोन मोठ्या प्लॅस्टिक ट्युब आहेत, ज्या फुप्फुसाशी जोडलेल्या आहेत. या ट्युबमार्फत छातीतील चेंबर्सपर्यंत हवा पोहोचवली जाते आणि शरीरात रक्तप्रवाह होतो. हे वाचा - पैशांसाठी विषारी सापांनी भरलेल्या टबमध्ये बसला आणि...; पाहून अंगावर येईल काटा मोटर सतत सुरू राहवं यासाठी तिच्या बॅगेत दोन बॅटरी असतात. एक बॅटरी संपली किंवा काही समस्या झाली तर दुसरी बॅटरी लावली जाते. बॅटरी बदलण्यासाठी तिच्याकडे फक्त 90 सेकंदाचा वेळ असतो. त्यामुळे बॅटरी संपण्याची भीती तर तिच्या मनात असते. पण तरी ती या कृत्रिम हृदयासह हसतखेळत आनंदी आयुष्य जगते आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Heart risk, Lifestyle, Wellness

    पुढील बातम्या