मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अजबच आहे! महिलेलाही माहिती नाही ती होती प्रेग्नंट; आकाशातच जन्माला आलं बाळ

अजबच आहे! महिलेलाही माहिती नाही ती होती प्रेग्नंट; आकाशातच जन्माला आलं बाळ

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

बाळाचं जन्म होईपर्यंत (Baby born in plane) आपण प्रेग्नंट आहोत याची माहिती त्या बाळाच्या आईलाच (Woman unaware about her pregnancy) नव्हती.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 03 मे : उलटी, चक्कर, मळमळणं अशी काही प्रेग्न्सीची (Pregnancy) लक्षणं असतात. आपण प्रेग्नंट आहोत हे यानंतर महिलांना समजतं. अशी लक्षणं जरी सुरुवातीला दिसली नाही तरी काही दिवसांनी पोटाचा आकार वाढत जातो. पोटात बाळाची हालचाल जाणवू लागते. पण एका महिलेला मात्र ती प्रेग्नंट आहे हे माहितीच नव्हतं (Woman unaware about her pregnancy) आणि तिने अचानकपणे बाळाला जन्म दिला आहे, तेसुद्धा आकाशात (Baby born in plane).

अमेरिकेतील ही आश्चर्यजनक अशी घटना आहे. विमानात एका महिलेची डिलीव्हरी झाली. हे विमान सॉल्ट लेक सिटूहून होनोलुलूला जात होतं. त्यावेळी विमानातच बाळाचा जन्म झाला आहे. आश्चर्य म्हणजे ज्या महिलेनं बाळाला जन्म दिला तिच्यासाठीच हा मोठा धक्का होता. कारण आपण प्रेग्नंट आहोत याची माहिती तिलाच नव्हती.

हे वाचा - प्रसूतीनंतर बाळासह आला आणखी एक मांसाचा गोळा; दुसरा गर्भ नाही तर...

डेली मेलच्या रिपोर्टनुसार लेविनिया मोंगा नावाची ही महिला आहे, जिनं बाळाला जन्म दिला आहे. तिचं बाळ वेळेआधीच जन्माला आलं आहे. 26 ते 27 आठवड्यांचं हे बाळ आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.

या घटनेबाबतचा टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जुलिया हँसन या महिलेने हा व्हिडीओ बनवला होता. त्यात ती म्हणाली, एका गर्भवती महिलेला विमानात जाऊ दिलं यावर माझाही विश्वास बसत नव्हता. मी या महिलेच्या वडिलांसोबत बसले होते. त्यांनी मला सांगितलं की लेविनिया गर्भवती आहे हे तिलाच माहिती नव्हतं. मला यावर विश्वासच बसत नव्हता.

First published:

Tags: Pregnancy, Pregnant woman, Small baby