Home /News /lifestyle /

कसं शक्य आहे! किडनी इन्फेक्शनवर उपचार करायला गेली महिला आणि अचानक जन्माला आलं बाळ

कसं शक्य आहे! किडनी इन्फेक्शनवर उपचार करायला गेली महिला आणि अचानक जन्माला आलं बाळ

पोटातील ज्या वेदनांना महिला किडनी इन्फेक्शन समजत होती त्या खरंतर प्रसूती वेदना होत्या.

    लंडन, 06 एप्रिल : एखादी महिला प्रेग्नंट असेल तर प्रसूतीवेळी तिच्या पोटात वेदना होता. ज्याला प्रसूती वेदना म्हणजे लेबर पेन म्हणतात. पण त्याआधी प्रेग्नन्सीची लक्षणं दिसतात. बेबी बम्प वाढलेलं असतं. एका महिलेच्या पोटात वेदना झाल्या पण त्याशिवाय तिच्यात प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं दिसली नाही. त्यामुळे पोटातील वेदना म्हणजे किडनी इन्फेक्शन असावं असं समजून ती रुग्णालयात गेली आणि तिथं तिने बाळालाच जन्म दिला. अशा अचानक प्रेग्नन्सीमुळे महिलाही शॉक झाली (Baby born without pregnancy symptoms). यूकेतील 29 वर्षांची रशेल फॉर्गेटीच्या (Rachael Fogarty) पोटात वेदना होत होत्या म्हणून ऑफिसवरून  घरी लवकर आली. पण पोटदुखी इतकी होती की रात्रभर ती झोपू शकली नाही. तिने आपात्कालीन नंबरवर फोन केला. पण अॅम्ब्युलन्स वेळेत आली नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे वडील तिला घेऊन रुग्णालयात गेले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला नेमकी काय समस्या आहे ते समजेना. शेवटी तिला महिला रोग तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलं.  तिथं तिला जी बातमी मिळाली, ती ऐकताच तिला धक्का बसला (Woman Got Surprise Baby).  रशेलच्या पोटातील वेदना किडनीच्या समस्येमुळे होत नव्हती. तर तिला त्या प्रसूती वेदना होत होत्या. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार आपण प्रेग्नंट आहोत याची माहिती या महिलेलाही नव्हती. ती आपल्या पार्टनरसोबत 10 वर्षांपासून राहते. पण आपण प्रेग्नंट होऊ शकत नाही, यावर तिला विश्वास होता. त्यामुळे आपण प्रेग्नट नाहीच असं ती डॉक्टरला सांगत होती. पण रशेलच्या पोटात बाळ आहे आणि ते लवकरच या जगता येणार आहे, हे डॉक्टरांनी रशेलला स्पष्टपणे सांगितलं. तिचं अल्ट्रासाऊंडही करण्यात आलं. आपला हा सरप्राइझ बेबी पाहून तिला आपण आई होणार आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. काही वेळातच तिने बाळाला जन्मही दिला. ही प्रेग्नन्सी तिच्यासाठी मोठा धक्का होता. तिच्या ऑफिसमध्येही कुणाला यावर विश्वास बसत नव्हता. पण या बाळाला पाहून तिचा पार्टनर आणि कुटुंबाला आनंद झाला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Pregnancy, Pregnant, Pregnant woman

    पुढील बातम्या