मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कपड्यांमुळे झालं महिलेच्या भयंकर आजाराचं निदान; ज्याला समजत होती शरीराचं फॅट तो खरंतर...

कपड्यांमुळे झालं महिलेच्या भयंकर आजाराचं निदान; ज्याला समजत होती शरीराचं फॅट तो खरंतर...

महिलेच्या पायाचा आकार लहानपणापासून वाढत होता. डॉक्टरांनीही तिला फॅट म्हणजे चरबी असल्याचं सांगितलं होतं.

महिलेच्या पायाचा आकार लहानपणापासून वाढत होता. डॉक्टरांनीही तिला फॅट म्हणजे चरबी असल्याचं सांगितलं होतं.

महिलेच्या पायाचा आकार लहानपणापासून वाढत होता. डॉक्टरांनीही तिला फॅट म्हणजे चरबी असल्याचं सांगितलं होतं.

    लंडन, 08 ऑगस्ट :  कपड्यांचं काम म्हणजे शरीर झाकणं. पण सध्या फॅशन म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात. पण याच कपड्यांमुळे महिलेला तिला असलेल्या भयंकर आजाराबाबत समजलं. ज्याला ती लहानपणापासून आपल्या शरीरावरील फॅट समजत होती, तो खरंतर तिला झालेला दुर्मिळ आजार होता. आपल्या सूजलेल्या पायाचं नेमकं कारण समजल्यावर तीसुद्धा हादरली. लठ्ठ लोकांच्या हातापायांचा आकार खूप मोठा असतो. त्यांच्या हातापायात खूप फॅट किंवा चरबी असतं. 36 वर्षांची थेरेसा फ्रेडेनबर्ग-हिंड्स जिच्या शरीराचा आकारही असाच होता. लहानपणापासूनच ती लठ्ठ होती. पण तिच्या पायाचा आकार खूपच मोठा होता आणि हळूहळू तो वाढत गेला. तिने डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी तिच्या पायात फॅट म्हणजे तरबी जमा होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे तिनेही लक्ष दिलं नाही. पण तिच्या पायाचा आकार हळूहळ वाढत गेला. ज्याचा तिच्या दैनंदिन आयुष्यावर खूप परिणाम झाला. हे वाचा - Cholesterol : वजन वाढणं आणि कोलेस्ट्रॉलचा असा आहे संबंध; रिस्क फॅक्टर ओळखून उपाय सुरूच करा थेरेसा म्हणाली, मला लठ्ठपणा आहे, त्यामुळे लोअर बॉडीत फॅट जमत असल्याचं मला सांगितलं. पण माझ्या या स्थितीमुळे माझ्या आयुष्यावर परिणाम होऊ लागला. मी बराच वेळ उभी राहू शकत नव्हती, जिने चढू शकत नव्हे कारण माझा कमरेखालील भाग खूप वजनदार होता. खुर्च्यांमध्ये बसल्यावरही मी अडकायचे. कारमध्ये जास्त वेळ बसू शकत नव्हती.  वेदना आणि सूज कमी करण्यासाठी कम्प्रेशन स्टॉकिंग्स घालायची. त्यामुळे त्वचा टाइट राहायची आणि चालताना माझा बॅलेन्स जायचा नाही. स्टॉकिंग्ज म्हणजे नायलॉन किंवा सिल्कचे टाइट मोजे जे जांघेपर्यंत येतात. हेच स्टॉकिंग्ज आणायला ती एकदा दुकानात गेली. तेव्हा दुकानदाराने तिचे पाय पाहिले आणि फक्त पाय पाहूनच तिचा आजार ओळखला. त्याने तिला लिम्फोएडेमा किंवा लिपोएडेमा असल्याचं सांगितलं. त्याच्याकडे असे बरेच ग्राहक आले होते, त्यामुळे पाहताच त्याने तिचा हा आजार ओळखला.  त्यानंतर ती पुन्हा डॉक्टरांकडे गेली आणि तिने आपल्या तपासण्या करून घेतला. तेव्हा तिला लिम्फो-लिपोएडेमा असल्याचं निदान झालं. हे वाचा - अंड्यातील पिवळा बलक शरीरासाठी किती आरोग्यदायी असतो? नेमकी माहिती जाणून घ्या महिला स्टॉकिंग्ज खरेदी करायला गेली, जिथं दुकानदाराने तिला या आजाराबाबत सांगितलं. त्यामुळे कपड्यांमुळेच महिलेच्या या दुर्मिळ आजाराचं निदान झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या