मुंबई, 13 डिसेंबर: लग्नसराईची सध्या सर्वत्र धूम सुरु आहे. रोज अनेकांची लग्न होत आहेत. लग्नातल्या फोटोंनी सोशल मीडिया (Social Media) व्यापून टाकला आहे. डिसेंबरमधल्या थंडीत हानीमूनला (Honeymoon) जाण्याची तयारी देखील अनेक जोडप्यांनी (Wedding Couple ) केली आहे. सध्या एकमेकांच्या प्रेमात असलेली काही जोडपी देखील आपल्या पार्टनरला प्रोपज करण्यासाठी नव्या नव्या युक्त्या करतात. तर काहींना येत्या काळात पार्टनर प्रपोज करेल अशी आशा असते. ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर यापैकी काही नाराज देखील होतात.
बराच काळ रिलेशिनशिपमध्ये राहूनही बॉयफ्रेंडनं प्रपोज न केल्यानं एका महिलेनं चक्क कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. झाम्बियामधील (Zambia) एका महिलेनं तिच्या बॉयफ्रेंडवरच खटला दाखल केलाय. आठ वर्ष रिलेशिनशिपमध्ये राहून देखील एकदाही प्रपोज न केल्यानं नाराज झालेल्या या महिलेनं आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी कोर्टात धाव घेतली आहे.
हे वाचा-शिक्षा सुनावल्याचा राग आल्याने न्यायाधीशांवरच भिरकावली चप्पल, आता...
गट्रूर्ड नगोमा (Gertrude Ngoma) असं या 28 वर्षांच्या महिलेचं नाव असून तिला तिचा बॉयफ्रेंड हबर्ट साललिकी (Herbert Salaliki) लग्नासाठी प्रपोज करेल अशी आशा होती. बराच काळ वाट पाहिल्यानंतरही नगोमाची अपेक्षा पूर्ण झाली नाही, त्यामुळे ती निराश झाली आणि तिने कोर्टात केस दाखल केली. लग्नाचा प्रस्ताव न दिल्यानं आपला जवळपास एक दशकाचा काळ प्रियकरानं वाया घालवला, अशी तक्रार या नगोमानं केली आहे. नगोमाला साललिकीपासून एक मुलगा देखील आहे.
प्रपोज न करण्याचं कारण काय?
‘आर्थिक अडचणींमुळे आपण अजून लग्नासाठी तयार नाहीत’, असा दावा नगोमाच्या बॉयफ्रेंडनं केला आहे. स्थानिक रितीरिवाजानुसार बॉयफ्रेंडला लग्न करताना नगोमाच्या परिवाराला हुंड्याची मोठी रक्कम द्यावी लागते. दरम्यान, साललिकीचे आणखी एका तरुणीसोबतही अफेयर सुरु असल्याचा आरोप नगोमानं केला आहे.