कुत्र्याच्या मृत्यूची मागितली सुट्टी म्हणून कामावरून टाकलं काढून

कुत्र्याच्या मृत्यूची मागितली सुट्टी म्हणून कामावरून टाकलं काढून

ज्या दिवशी तिचा कुत्रा मेला त्या दिवशी ती पुरती खंगली होती आणि आजारीही होती. पण तरीही त्याच दिवशी तिला कामावर यायला सांगण्यात आलं.

  • Share this:

ग्लासगो, 16 ऑगस्ट- आतापर्यंत तुम्हाला घरातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून मिळालेल्या सुट्ट्या माहीत असतील. पण ब्रिटनमध्ये एक नवीन प्रकार घडला आहे. इमा या मुलीने तिचा पाळीव कुत्रा वारला म्हणून सुट्टी मागितली. विशेष म्हणजे तिला मालकाने सुट्टी तर दिलीच नाही, शिवाय तिला कामावरूनही काढून टाकलं. इमा, ही युकेमधील ग्लासग्लो येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. एमाने दावा केला की, तिच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याने तिने शोक रजा अर्थात Bereavement Leave मागीतली. मात्र ही रजा मागितल्यामुळे तिला कामावरून काढून टाकण्यात आलं. 18 वर्षांची इमा मॅकनोल्टी एका सँडविच शॉपमध्ये पार्ट टाइम नोकरी करते. इमाच्या मते, तिचा 14 वर्षांचा कुत्रा ज्या दिवशी मेला त्या दिवशी तिला अफाट दुःख झालं होतं. ती पुरती खंगली होती आणि आजारीही होती. पण तरीही त्याच दिवशी तिला कामावर यायला सांगण्यात आलं होतं.

यानंतर इमाने हे प्रकरण न विसरण्याचा निर्णय घेतय मालकाविरोधात Chenge.org कडे याचिका दाखल केली. तसंच पाळीव प्राणी मेल्यास त्यासाठी Bereavement Leave देण्यात यावी अशी मागणीही तिने केली. बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, घरातील एखाद्या व्यक्तिच्या मृत्यूचं जेवढं दुःख असतं तेवढंच दुःख तिला तिचा पाळीव कुत्रा झाल्याने झालं होतं. तिचे सहकारी तिला मदत करतील असं वाटलं होतं, पण त्याएवजी त्यांनी बदली कामगाराची मागणी केली.

मॅकनोल्टीला तिच्या ठरलेल्या वेळेत कामावर पोहोचता आलं नाही. त्यामुळे तिला कामावरून काढून टाकण्यात आलं. इमाने तिच्या याचिकेत म्हटलं की, सहानुभूती दाखवणं तर सोडाच पण मला माझी ठरलेली शिफ्ट पूर्ण करण्यासाठीचे अनेक मेसेज पाठवण्यात आले. तसेच पाळीव कुत्रा मेल्याची कोणतीही सुट्टी नसते हेही सांगण्यात आलं. सध्या इमा मॅकनोल्टीच्या याचिकेला अनेकांकडून पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत 9 हजरा लोकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.

द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत युकेमधील अधिकृत चॅरिटेबल ट्रस्टने सांगितलं की, 'घरातील एखादा पाळीव प्राणी मेल्यानंतरचं जे दुःख मालकाला होतं ते कोणीही गृहित धरता कामा नये. हे दुःख फार मोठं असतं. आम्ही गेल्या 25 वर्षांपासून अशा दुःखी मालकांना पाठिंबा देत आहोत आणि हे दुःख किती मोठं असतं याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे,' असं ब्ल्यू क्रॉसच्या पेट बेरिव्हमेंट सपोर्ट सर्विसचे मॅनेजर डियान जेम्स म्हणाले.

जेव्हा घरातील एखादा पाळीव प्राणी मरतो, त्याच्या जाण्याचं दुःख हे घरातील एखादा सदस्य जाण्याच्या दुःखाप्रमाणेच किंवा त्याहून जास्त असतं. त्यामुळे ही हलक्यात घेण्याची गोष्ट नक्कीच नाही, असंही जेम्स म्हणाले. याचिकेत इमाने लिहिले की, कंपन्यांनी अशा सुट्टीही दिल्या पाहिजेत आणि त्यांना कामावरून काढून न टाकता कर्मचाऱ्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर पडायला वेळ दिला पाहिजे.

70 वर्षांची म्हातारी हत्तीण आठवतेय का? अशक्तपणामुळे अखेर ती कोसळली

कंबरदुखीपासून त्रस्त आहात तर हे घरगुती उपाय एकदा करून पाहा!

या पद्धतीने तुम्ही पावसाळ्यात टिकवू शकता भाज्या आणि कडधान्य

वेळीच सावध व्हा, या 7 कारणांमुळे घरातून दूर जाईल लक्ष्मी!

VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 05:45 PM IST

ताज्या बातम्या