कॅन्सर झाला म्हणून लोकांसमोर पसरले हात; उपचारासाठी मिळालेला पैसा महिलेनं चक्क जुगारावर उधळला

कॅन्सर झाला म्हणून लोकांसमोर पसरले हात; उपचारासाठी मिळालेला पैसा महिलेनं चक्क जुगारावर उधळला

कॅन्सर (cancer) झाल्याचं सांगून ऑनलाइन फंडिंग (online funding) जमवून महिलेनं लोकांची फसवणूक केली आहे.

  • Share this:

लंडन, 11 नोव्हेंबर : या फोटोतील चेहरा नीट पाहा. हा फोटो पाहून कुणालाही या महिलेची दया येईल. आपल्याला कॅन्सर (cancer) झाला आहे, उपचारासाठी पैसे हवे आहेत, म्हणून या महिलेनं लोकांसमोर हात पसरले. आपल्याला कॅन्सरशी लढण्यासाठी तुमच्या आर्थिक मदतीची गरज आहे, अशी याचना तिनं केली. महिलेचा जीव वाचण्यासाठी अनेकांनी तिला मदत केली. मात्र उपचारासाठी मिळालेला हा पैसा महिलेनं जुगार खेळला आहे.  यूकेतील महिलेवर फसवणुकीचा आरोप लावण्यात आला आहे.

42 वर्षांच्या निकोलनं आपल्याला कॅन्सर असल्याचं सांगितलं. मात्र उपचारासाठी आपल्याकडे पुरेसं पैसे नाहीत त्यामुळे ऑनलाइन फंडिंगमार्फत पैसा जमा करण्याचं तिनं ठरवलं. गोफंडमी पेजवर तिनं लोकांकडे मदत मागितली. आपल्याला कॅन्सर आहे, उपचारासाठी शक्य तितकी आर्थिक मदत करा अशी याचना तिनं केली.  निकोलनं आर्थिक मदत मागताना आपला एक फोटोही तिनं टाकला. ज्यामध्ये ती रुग्णालयात आहे. तिची प्रकृती खूपच गंभीर असल्याचं दिसतं आहे.

आज तकच्या रिपोर्टनुसार निकोलला 39 लोकांनी मदत केली. तिनं 45 हजार पाउंड म्हणजे जवळपास 44 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमवले.

हे वाचा - कसं शक्य आहे? सुंदर दिसते म्हणून Dating app नं मॉडेलला केलं बॅन

दरम्यान निकोलची मैत्रीण आणि स्त्रीरोग तज्ज्ञ निकोलस मॅरिसनं सांगितलं की, निकोलला कोणताही कॅन्सर नाही. ती आपल्या क्लिनिकमध्ये कधीच आली नाही आणि आपण तिच्यावर कधीच उपचार केले नाहीत. दरम्यान निकोलचा हा फोटो कॅन्सरवरील उपचार घेतानाचा नाही तर तिनं आपल्या पित्ताशयाचं ऑपरेशन केलं तेव्हाचं आहे, असं सांगितलं जातं आहे.

कॅन्सर असल्याचं खोटं सांगून निकोलनं पैसे जमवले आणि या पैशांतून मजा केली. तिनं लोकांची फसवणूक केली, असा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे.

हे वाचा - संपूर्ण जगासाठी संकट पण तिच्यासाठी वरदान ठरला कोरोना; संपूर्ण आयुष्यच बदललं

याबाबत तक्रारदार बेन इर्विन यांनी सांगितलं, आपली लाइफस्टाइल मेंटन करण्यासाठी निकोलनं आपल्याला कॅन्सर झाल्याचं खोटंखोटं सांगितलं. तिनं आपल्या पैशांचा वापर कॅन्सरवर उपचारासाठी नाही केला. तर या पैशांतून तिनं जिवाची मजा केली. प्रवास केला, रेस्टॉरंट्समध्ये गेली, फुटबॉल मॅच पाहिली, ऑनलाइन गँबलिंग केलं.

Published by: Priya Lad
First published: November 11, 2020, 5:39 PM IST

ताज्या बातम्या