Home /News /lifestyle /

...अन् लग्नानंतर महिलेने तोंडालाच लावली पट्टी; संसार वाचवण्यासाठी विचित्र उपाय

...अन् लग्नानंतर महिलेने तोंडालाच लावली पट्टी; संसार वाचवण्यासाठी विचित्र उपाय

फक्त दिवसभरच नव्हे अगदी रात्री झोपतानाही ही महिला तोंडाला पट्टी लावूनच झोपते.

    लंडन, 03 जानेवारी : लग्नानंतर बहुतेक कपल्सना आपल्या पार्टनरनुसार स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात. असाच बदल एका महिलेने केला. पण तिचा हा बदल म्हणजे आश्चर्यचकीत करणारा असा होता. लग्नानंतर तिने असं विचित्र कृत्य केलं, ज्यामुळे सर्वजण शॉक झाले आहेत. तिने आपल्या तोंडावर पट्टी लावायला सुरुवात केली (Woman Taped Mouth to Save Marriage). ब्रिटनमध्ये राहणारी 33 वर्षांची जेन टॅरेन्ट (Jane Tarrant) आपला नवरा आणि मुलांसोबत राहतो. जेनला एक विचित्र समस्या होती, ज्यामुळे तिचा नवरा वैतागला होता. तिच्या वैवाहिक आयुष्यात तिची ही समस्या मोठी अडचण ठरत होती. त्यावेळी जेनने असा मार्ग निवडला ज्यामुळे तिची ही समस्या दूर होईल (Britain Woman Tape Mouth). जेनला हेव्ही ब्रीदिंगची (Heavy Breathing) समस्या होती. जेन नाकाने श्वास घेऊ शकत नव्हती. ती नाकाऐवजी तोंडाने श्वास घ्यायची (Woman Breath from Mouth instead of Nose). उठता, बसता, चालताना ती तोंडानेच श्वास घ्यायची. ज्यामुळे तिच्या श्वासाचा आवाज इतका यायचा की दुसऱ्या व्यक्तीलाही तो ऐकू यायचा. हे वाचा - सावधान! महिलांना त्रास देणाऱ्यावर आता ड्रोनचा वॉच; अवघ्या 4 मिनिटांतच मिळणार मदत द सन वेबसाईटशी बोलताना जेनने सांगितलं, तिचा नवरा तिच्या मोठ्या आवाजातील श्वासामुळे वैतागला होता.  तिला लवकर धाप लागायची आणि त्याचा आवाज यायचा. मुलांना स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी ती काही अंतर चालायची तेव्हाही खूप थकायची. रात्री तोंड उघडं ठेवून झोपल्याने ती खूप घोरायची. आपली ही समस्या आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. तसंच यामुळे आपलं वैवाहिक आयुष्यही अडचणी सापडलं आहे. त्यामुळे या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तिने विचित्र उपाय केला. जेनने नाकाने श्वास घेण्याची सवय व्हावी म्हणून तिने आपल्या तोंडावर टेप लावायला सुरुवात केली  (Woman Puts Tape on Mouth to Breath from Nose). बाहेर जाताना आणि अगदी झोपतानाही ती आपल्या तोंडाला टेप लावूनच झोपायला लागली. दिवसभर ती कमी बोलायची. यानंतर की हळूहळू तोंडाऐवजी नाकाने श्वास घेऊ लागली. हे वाचा - ऑस्ट्रेलियन Accent मुळे तरुणावर फिदा झाली युवती; बॉयफ्रेंडची केली फसवणूक तिचा हा विचित्र उपाय परिणामकारकही ठरला. मोठमोठ्याने श्वास घेण्याची तिची सवय आता कायमची गेली. रात्री झोपताना आता ती कमी घोरते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Woman

    पुढील बातम्या