Home /News /lifestyle /

अजबच! 9 महिने बिलकुल पोट वाढलं नाही; Delivery दिवशीच महिलेला समजलं ती होती Pregnant

अजबच! 9 महिने बिलकुल पोट वाढलं नाही; Delivery दिवशीच महिलेला समजलं ती होती Pregnant

महिलेने आपल्या विचित्र प्रेग्न्सीचा अनुभव स्वतःच मांडला आहे.

    मुंबई, 13 जानेवारी : गेल्या काही महिन्यांपासून नवऱ्यापासून  दूर राहत होती, गर्भनिरोधक गोळ्याही घेत होती. साहजिकच अशा परिस्थितीत कोणतीच महिला आपण प्रेग्नंट होऊ याचा विचारही करणार नाही (Pregnancy without baby bump). त्यातही महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढतो म्हणजे बेबी बम्प दिसू लागतो (Woman pregnant without baby bump). पण असं पोटाचा आकार न वाढता, बाळाला जन्म देणं म्हणजे आश्चर्यच नव्हे का? असं होणं शक्यच नाही असं तुम्ही म्हणाल. पण या अशक्य गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तो एका महिलेने (Woman know about her pregnany on delivery day). एका 22 वर्षांच्या महिलेने आपल्या प्रेग्न्सीचा विचित्र अनुभव स्वतःच मांडला आहे. महिलेला तिच्या प्रेग्नन्सीबाबत माहितीच नव्हतं आणि नवव्या महिन्यात तिची थेट डिलीव्हरी झाली. तिने एका मुलीला जन्म दिला आणि तेव्हाच तिला आपण प्रेग्नंट होतो हे समजलं. तिच्यासाठी हा मोठा धक्का होता. या कालावधीत नेमकं या महिलेसोबत काय काय झालं ती तिने सांगितलं आहे. महिलेने सांगितलं, "पहाटे 4 वाजता माझे पोट प्रचंड दुखू लागले. माझ्या वेदना वाढत जात होत्या. माझा चेहरा पिवळा पडला होता आणि मी थरथरत होती." महिलेची अवस्था पाहून तिची आईसुद्धा घाबरली. तिने तिला पॅरासिटामोल दिली. वेदनाशामक गोळी घेतल्यानंतर महिला ऑफिसला गेली. तिने सांगितलं, "आईने दिलेली गोळी खाऊन स्वत:ला कशीबशी सावरत मी ऑफिसच्या बसमध्ये चढले. त्यानंतर पुढे काय झालं माहिती नाही. मी डोळे उघडले तेव्हा रुग्णालयात होते आणि माझ्या बाजूला नवजात बाळ होतं. ते पाहून मला धक्काच बसला. मी एका मुलीला जन्म दिला आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता" हे वाचा - कोरोनाचा प्रायव्हेट पार्टवरही परिणाम? तरुणाने सांगितला धक्कादायक अनुभव "मी 5 महिने माझ्या पतीपासून वेगळी राहत होती. माझी मासिक पाळी मिस व्हायची मात्र मला याची सवय झाली होती. माझं वजन देखील वाढलं पण ते जास्त स्ट्रेसमुळे असावंस असं वाटलं. मी आरशात बघायची तेव्हासुद्धा मला साधी शंका देखील यायची नाही की मी गरोदर आहे. ना क्रेव्हिंग, ना उलटी, ना मळमळ. माझ्यात कोणतंच लक्षण नव्हतं. मला माहित नव्हते की मी नऊ महिन्यांची गरोदर आहे. म्हणूनच जे घडले ते अविश्वसनीय होतं", असं ती म्हणाली. महिलेने स्वतःची डिलीव्हरी स्वतःच केली. बाथरूममध्येच तिने मुलीला जन्म दिला. याबाबत सांगताना ती म्हणाली, "ऑफिसला गेल्यावर मला अधिक त्रास झाला होता म्हणून मी घरी आले बाथरूममध्ये गेले. शेजाऱ्यांनी माझा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि ते धावत माझ्या मदतीसाठी आले. तेव्हा मी प्रसूती कळा सहन करत होते. मी गरोदर आहे ही गोष्ट मला थेट माझ्या डिलीव्हरीवेळी समजली. मला मासिक पाळी का येत नव्हती हे तेव्हा कळलं. माझं संपूर्ण शरीर वेदनेनं बेजार झालं. होतं आणि तेवढ्यात माझी नजर माझ्या व्हजायनामधून बाहेर येणाऱ्या बाळाच्या डोक्याकडे गेली.  तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तिथं मी स्वतःच्या हातानेच माझी डिलीव्हरी केली. त्यानंतर मला अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं" हे वाचा - आत्महत्येसाठी 86 व्या मजल्यावरून उडी मारूनही बचावली महिला; काय चमत्कार झाला पाहा "मी माझ्या पतीपासून काही महिन्यांपासून वेगळे राहत होते आणि या काळात गर्भधारणेचा विचारही केला नव्हता पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. अशी गोष्ट कोणासोबतही होऊ शकते. त्यामुळे शरीरात विचित्र बदल दिसलं तर त्याकडे दुर्लक्ष न करता एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या", असा सल्ला या महिलेने महाराष्ट्र टाइम्समध्ये दिलेल्या लेखात दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman

    पुढील बातम्या