Home /News /lifestyle /

23 वर्षे फक्त चिप्स आणि सँडवीच खात राहिली तरुणी; आता अशी अवस्था झाली की...

23 वर्षे फक्त चिप्स आणि सँडवीच खात राहिली तरुणी; आता अशी अवस्था झाली की...

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तिने चिप्स, सँडवीच खायला सुरुवात केली. तेव्हापासून ती त्याशिवाय दुसरं काहीच खात नाही.

    लंडन, 26 मे : आपल्या प्रत्येकाचा किमान एक तरी आवडता पदार्थ असतोच (Food Addiction). हा पदार्थ कधीही आणि कितीही दिला तरी आपण खाऊ शकतो. पण कोणतीही गोष्ट अति वाईटच. याचाच अनुभव घेते आहे, ती 25 वर्षांची एक तरुणी. जी गेली 23 वर्षे फक्त चिप्स आणि सँडवीचवरच जगली (Woman Have Sandwitch Addiction). आवडू लागले म्हणून फक्त चिप्स-सँडवीच खाण्याची सवय तिला आता चांगलीच महागात पडली आहे (Woman only ate chips sandwiches for 23 years). 25 वर्षांची जो सॅडलर (Zoe Sadler )  वयाच्या दुसऱ्या वर्षापासून चिप्स आणि सँडवीच खात आली. एखाद्याला एखाद्या पदार्थाची अॅलर्जी असते. ज्यामुळे ती व्यक्ती तो पदार्थ खाऊ शकत नाही. पण जोच्या बाबतीच असं काहीच नव्हतं. वयाच्या दुसऱ्या वर्षी तिने चिप्स-सँडवीच खाल्लं आणि तिला त्याची चव इतकी आवडली की तेव्हापासून ती त्याशिवाय दुसरं काहीच खात नाही. अगदी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तिचं हेच खाणं असायचं. शाळेच्या लंचबॉक्समध्येही ती हेच पदार्थ घेऊन जायची. हे वाचा - मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण पण तिची ही सवय तिला आता भारी पडत आहे. तिला मल्टीपल स्केलेरोसिस (Multiple Sclerosis ) हा आजार झाला. हा असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरावर नियंत्रण राहत नाही. शरीर दुर्बल होत जातं. यामध्ये हेल्दी राहणं आणि त्यासाठी हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे. मिररच्या रिपोर्टनुसार लहानपणापासून फक्त चिप्स आणि सँडवीच खाणाऱ्या सॅडलरवर आता खाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. तिच्यावर खाण्यासाठी थेरेपी घेण्याची वेळ ओढावली आहे. थेरेपीमार्फत ती आपलं डाएट हेल्दी बनवण्यचा प्रयत्न करत आहे. हे वाचा - आधी पाल असलेली Cold drink दिली आणि नंतर...; McDonald’s मधील संतापजनक प्रकार; Video Viral तिला डाएटसाठी मदत करणारे तिचे थेरेपिस्ट डेव्हिड यांनी सांगितलं, मल्टीपल स्लेरोसिस झाल्यावर ती आता फक्त चिप्स आणि सँडवीचवर नाही राहू शकत. तिला स्वतःला हेल्दी बनवण्याची गरच आहे. ती आता काही फळं आणि रस्सेदार भाज्या खाऊ लागली आहे. दोन-तीन सेशननंतर ती नवनवे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या