Home /News /lifestyle /

महिलेने दही घालून खाल्ली मॅगी, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा धुमाकूळ

महिलेने दही घालून खाल्ली मॅगी, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा धुमाकूळ

महिलेने मॅगी (Maggi) वर केलेला प्रयोग तिच्या चांगलाच अंगलट आला आहे. मॅगीमध्ये दही घालून खाल्ल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.

    मुंबई : अनेकदा आपण जेवणामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करतो. खाण्याच्या चवीमध्ये बदल येण्यासाठी एखाद्या पदार्थात आपण दुसरा पदार्थ मिसळत असतो. अशाच पद्धतीने एका महिलेने प्रयोग केल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. या महिलेने मॅगी (Maggi) वर केलेला प्रयोग  सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तिच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. मॅगी हा फास्ट फूड पदार्थ भारताच्या घराघरांत तयार होतो. लहानपणापासून आपण टीव्हीवर जाहिरातीत त्याची पाककृती पाहिली आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांवरही मॅगीची मोहिनी पडली आहे. या मॅगीवर या महिलेने केलेल्या प्रयोगामुळे नेटकरी उसळले आणि मग एकामागोमाग एक मजेशीर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. फेलन मस्क नावाच्या एका महिला युजरने आपल्या या प्रयोगाचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. यामध्ये ती दही आणि मॅगी एकत्र करून खाताना दिसून येत आहे. तिने हा फोटो अपलोड केल्यानंतर नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. एकाने लिहिले की, मी पोलिसांना बोलवत आहे. तर एकाने लिहिले की, गरुड पुराणात यासाठी खास शिक्षा आहे. तर एकाने याला मॅगी-दही शानदार जोडी म्हटलं आहे. तर एकाने या महिलेला विचारले मी कधी हे खाल्ले नाही? याचा स्वाद कसा होता. यावर तिने उत्तर देताना म्हटले, दही सर्वोत्तम असून कोणत्याही पदार्थाबरोबर खाल्लं तरी छानच लागतं. दरम्यान, आणखी एका युजरने म्हटले ‘जगात चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा यामुळेच सुरु झाली असावी.’ तर एकाने मला मॅगी आवडत नाही पण दह्याचे अशा पद्धतीने नुकसान करू नये म्हटले आहे. तर एकाने मीमच्या रूपात याचे उत्तर देताना 'तौबा..तौबा तौबा सर्व मूड खराब केला, असे म्हटले आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या