मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बापरे! नखावरील या साध्या डागामुळे महिलेला कापावं लागलं आपलं बोट; शॉकिंग आहे कारण

बापरे! नखावरील या साध्या डागामुळे महिलेला कापावं लागलं आपलं बोट; शॉकिंग आहे कारण

 सामान्य वाटणारा नखांवरील डाग किती खतरनाक ठरू शकतो, याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे.

सामान्य वाटणारा नखांवरील डाग किती खतरनाक ठरू शकतो, याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे.

सामान्य वाटणारा नखांवरील डाग किती खतरनाक ठरू शकतो, याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 27 एप्रिल :  आपल्या नखांवर कधी ना कधी आपल्याला एखादा डाग दिसतो (Mark on nail). कधी पांढरी तर कधी काळी रेष दिसते. या डागांचा संबंध वेगवेगळ्या कारणांशी जोडला जातो. काहींना हा डाग सामान्य आहे, असंच वाटतं. पण सामान्य वाटणारा नखांवरील डाग किती खतरनाक ठरू शकतो, याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. साधा, सामान्य, छोटाशा वाटणाऱ्या नखांवरील याच डागामुळे तिच्यावर आपलं बोट कापण्याची वेळ ओढावली. नखांवरील डागामुळे तिने आपलं बोट गमावलं आहे. 40 वर्षांची एलिझाबेथ मिसेलब्रुक (Elizabeth Misselbrook) तिला आपल्या नखांवर एक डाग दिसला. तिला हे काहीतरी वेगळं असल्याचा संशय आला त्यामुळे तिने डॉकटरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि काही चिंतेचं कारण नसल्याचं सांगितलं. तिचं नख काढून टाकण्यात आलं. पण  पुन्हा जेव्हा नख वाढलं तेव्हा त्यावर आणखी वेगळा आणि मोठा डाग आला. त्यानंतर तिला बायोप्सी करण्याचा सल्ला देण्यात आला आणि हा डाग साधा, सामान्य नव्हता हे स्पष्ट झालं. तिला कॅन्सर असल्याचं निदान झालं (Skin Cancer in nail). हे वाचा - OMG! फक्त विचारानेच Fat To Fit केलं, 110 किलोची महिला 59 किलोची झाली; सांगितली Weight Loss Trick डेली मेलच्या रिपोर्टनुसार एलिझाबेथ म्हणाली,  मे 2021 मध्ये डॉक्टरांनी मला मेलेनोमा स्टेज 1 ए असल्याचं सांगितलं. म्हणजे हा आक्रमक आहे, पण जास्त नाही. तिला एक्रर लेंटिगिनस सबंगुअर मेलेनोमा होता, जो एक दुर्मिळ स्किन कॅन्सर आहे. त्यानंतर तिचं पूर्ण बोटच कापण्यात आलं. एलिझाबेथ म्हणाली, माझ्या बोटात दोन मेलेनोमा होते जे पूर्णपणे हटवण्यात आले जेणेकरून पुन्हा तो होऊ नये. त्यासाठी माझं बोट कापण्यात आलं. जेव्हा त्यांनी माझं बोट कापलं तेव्हा लिहिणार कशी, बासरी कशी वाजवणार याचीच चिंता होती. पण मला जगायचंही होतं. त्यामुळे मी मन घट्ट केलं. हे वाचा - लग्नाआधी नवरा-नवरीची खास सर्जरी करण्याचा ट्रेंड; लाखो रुपये मोजण्याचीही तयारी एलिझाबेथ आता इतर लोकांना सावध केलं आहे. नखांवरील डागांकडे दुर्लक्ष न करू नये कारण हे त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं, असं आवाहन तिने केलं आहे.
First published:

Tags: Cancer, Disease symptoms, Health, Lifestyle, Rare disease

पुढील बातम्या