Home /News /lifestyle /

आश्चर्य! नवऱ्याच्या मृत्यू्च्या 2 वर्षांनंतर त्याच्याच मुलाची आई झाली महिला; कसा झाला चमत्कार पाहा

आश्चर्य! नवऱ्याच्या मृत्यू्च्या 2 वर्षांनंतर त्याच्याच मुलाची आई झाली महिला; कसा झाला चमत्कार पाहा

नवऱ्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी जन्माला आलं त्याचं बाळ.

    लंडन, 24 जून : नवऱ्याचा मृत्यू झाला त्यावेळी ती प्रेग्नंट नव्हती. पण तरी त्याच्या मृत्यूच्या दोन वर्षांनंतर ती आता त्याच्याच मुलाची आई झाली आहे. प्रेग्नन्सीच्या या प्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. नवरा मृत झालेल्या असताना निधनाच्या दोन वर्षांनंतर त्याच्या मुलाची आई होणं कसं शक्य आहे? हा चमत्कार झाला तरी कसा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हा चमत्कार शक्य झाला तो म्हणजे प्रगत तंत्रज्ञानामुळे (Woman gives birth to her late husband baby). यूकेतील लिव्हरपूल राहणारी  लॉरेन मॅकग्रेगर. जिचा नवरा क्रिसचं जुलै 2020 मध्ये निधन झालं. त्याला ब्रेन ट्युमर होता. क्रिस आणि लॉरेनला एक मूल हवं होतं. पण अचानक क्रिसचा मृत्यू झाला आणि त्यांचं स्वप्न तुटलं. क्रिसच्या जाण्यानंतर लॉरेनच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. आपल्या नवऱ्याचं आणि आपलं मुलाचं स्वप्नं अपूर्णच राहिलं, याची खंत तिला वाटत होती. पण काही करून हे स्वप्न साकार करायचंच हे तिने ठरवलं. आता पतीचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्यापासून लॉरेन प्रेग्नंटही नव्हती तर मग तो हयात नसताना त्याचं मूल आता जन्माला कसं येईल? पण लॉरेनने हार मानली नाही. तिने आयव्हीएफ टेक्निकी मदत घेण्याचं ठरवलं. हे वाचा - प्रसूतीनंतर वजन कमी करणं पडलं महागात; थेट जावं लागलं ‘आयसीयू’मध्ये क्रिसच्या मृत्यूनंतर जवळपास 9 महिन्यांनी तिने आयव्हीएफमार्फत आई बनण्याचा प्रवास सुरू केला. क्रिसचे स्पर्म फ्रिज केले होते. ज्याचा वापर तिने त्याच्या मृत्यूनंतर आपल्या गर्भधारणेसाठी केला. लॉरेनने 17 मे 2022 ला आपल्या मृत नवऱ्याच्या मुलाला जन्म दिला. म्हणजे क्रिसच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्याचं बाळ जन्माला आलं. लॉरेनने त्याचं नाव सेब ठेवलं. रिपोर्टनुसार लॉरेन सांगते, सेब आपल्या वडिलांप्रमाणेच दिसतो. जेव्हा तो जन्माला आला तेव्हा त्याचे केस आणि डोकं वडिलांसारखंच होतं. त्याची हेअरलाइनही क्रिससारखी एम आकारात आहे. क्रिसचे कितीतरी गुण त्याच्यात आहेत. त्यामुळे आम्ही त्याला क्रिसही म्हणतो. हे वाचा - बापरे! ही अशी कसली मजा? कपलचा हा VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा क्रिस जिथं कुठे गेला तिथं त्याने त्याची आठवण म्हणून मला त्याचा एक छोटासा तुकडा दिला आहे. सेबला त्याच्या वडिलांचा फोटो दाखवून त्याची ओळख करून द्यावी असं मला कधीच वाटलं नाही. कारण ते एकमेकांना आधीपासूनच ओळखतात असं वाटतं, असंही ती म्हणाली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Viral

    पुढील बातम्या