• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • OMG! जुळी-तिळी नाही तर महिलेनं एकाच वेळी दिला चक्क 9 बाळांना जन्म

OMG! जुळी-तिळी नाही तर महिलेनं एकाच वेळी दिला चक्क 9 बाळांना जन्म

या नऊ बाळांमध्ये (Woman gave birth to 9 babies) पाच मुली आणि चार मुलगे आहेत.

  • Share this:
माली, 05 मे : जुळी (Twins) किंवा तिळी (Triplets) म्हणजे एकावेळी दोन किंवा तीन मुलं होण्याच्या घटना ही काही आता विशेष बाब राहिलेली नाही. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीनं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. त्याही पुढे जाऊन एका वेळी पाच किंवा सात बाळं होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. नुकतीच वैद्यकीय शास्त्रातली एक अतिशय दुर्मिळ घटना घडली आहे. ती म्हणजे एका महिलेनं एकावेळी तब्बल 9 बाळांना जन्म दिला आहे (Woman gave birth to 9 babies). माली देशातील हलिमा सिसे (Halima Cisse) या 25 वर्षीय महिलेने मोरोक्कोमधील (Morocco) सरकारी रुग्णालयात मंगळवारी नऊ बाळांना (Nonuplets) जन्म दिला. अल्ट्रासाऊंड तपासणीनुसार, तिच्या गर्भात सात अर्भकं असावीत असा डॉक्टरांचा अंदाज होता. त्यामुळे डॉक्टरांना सिसे आणि तिची बाळं यांच्या प्रकृतीविषयी चिंता होती. प्रसूतीदरम्यान कोणतीही तातडीची स्थिती निर्माण झाल्यास तात्काळ उपचार व्हावेत या दृष्टीनं तिला मालीहून 30 मार्च रोजी मोरोक्को इथल्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. मंगळवारी, 4 मे रोजी तिनं नऊ अर्भकांना जन्म दिला. माली सरकारनंही या वृत्ताला पुष्टी दिली आहे. हे वाचा - मातांनो सावधान! दुसऱ्या लाटेत बाळांना Coronaचा धोका वाढला गर्भांची संख्या जास्त असल्यास आई आणि बाळांच्या दृष्टीनं धोका अधिक असतो. मात्र ही सर्व बाळं आणि त्यांची आईही सुखरूप असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आरोग्य मंत्री फांता सिबी यांनी ‘एएफपी’ ला सांगितलं, "सिसे हिच्याबरोबर मालीतील डॉक्टर मोरोक्को इथं गेले आहेत. त्यांनी याबाबत माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. सिसे हिनं जन्म दिलेल्या नऊ बाळांमध्ये पाच मुली आणि चार मुलगे आहेत. काही आठवड्यांनी सिसे आणि तिची बाळं माली देशात परत येतील, असंही त्यांनी सांगितलं. हे दुर्मिळ बाळंतपण यशस्वी केल्याबद्दल त्यांनी माली आणि मोरोक्कोमधल्या डॉक्टरांच्या गटाचं अभिनंदन केलं आहे" हे वाचा - VIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ "या आधी आमच्या देशातील एखाद्या हॉस्पिटलमध्ये अशा नऊ बाळांचा जन्म झाल्याची माहिती नाही", असं मोरोक्कोच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते रचित कौधारी यांनी सांगितलं. मोरोक्कोनं अद्याप ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याबाबत अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. नऊ बाळांना एकाचवेळी जन्म देण्याची घटना अतिशय दुर्मिळ असल्यानं मालीतील या घटनेनं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
First published: