ना भांडली, ना ब्रेकअप केलं; दिलेलं वचन पूर्ण करत नाही म्हणून गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला थेट कोर्टात खेचलं

ना भांडली, ना ब्रेकअप केलं; दिलेलं वचन पूर्ण करत नाही म्हणून गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला थेट कोर्टात खेचलं

बॉयफ्रेंड (boyfriend) जेव्हा आपल्या वचनावरून पलटला तेव्हा गर्लफ्रेंडला (girlfriend) राग अनावर झाला.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : तब्बल 8 वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये (relationship). दोघांचंही एकमेकांवर जीवापड प्रेम. आपल्या भविष्याबाबत त्यांनी अनेक स्वप्नं रंगवली. असं करायचं तसं करायचं. ही स्वप्नं रंगवताना त्या स्वप्नांमध्ये ते दोघं जगत होते. मात्र जेव्हा ही स्वप्नं प्रत्यक्षात पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्याने टाळाटाळ केली. इतक्या वर्षांपासून रंगवलेली सर्व स्वप्नांची एका क्षणात राख झाली. मग गर्लफ्रेंडला (girlfriend) काही स्वतःवर ताबा राहिला नाही. तिचा संताप झाला. ती इतकी भडकली की बॉयफ्रेंडशी (boyfriend) भांडत नाही किंवा ब्रेकअप केलं नाही तर त्याला थेट कोर्टातच खेचलं. आफ्रिकेतील ही घटना आहे.

26 वर्षांची गरट्रूडे नगमा. तिचा बॉयफ्रेंड हर्बर्ट सलालिकी 28 वर्षांचा आहे. दोघंही एकमेकांवर प्रेम करतात. गेल्या आठ वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. हर्बर्टनं आपण तुझ्याशीच लग्न करणार असं वचनही नगमाला दिलं होतं. आता तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे. याबाबत तिनं हर्बर्टला सांगितलं. मात्र हर्बर्ट लग्नासाठी तयारच होत नाही आहे. आज तकनं mwebantu.com च्या रिपोर्टचा हवाला देत सांगितलं की, हर्बर्टपासून आपल्याला एक मूलही झाल्याचं नगमानं सांगितलं.

हे वाचा - बायकोसाठी कायपण! प्रसिद्ध कंपनीच्या CEO ने सोडला तब्बल 750 कोटी रुपयांचा बोनस

याबाबत स्पष्टीकरण देताना हर्बर्टनं सांगितलं की, त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. आर्थिक समस्यांता तो सामना करतो आहे. त्यामुळे आता लग्न करण्यासाठी तो तयार नाही. तर नगमा म्हणाली, परंपरेनुसार बॉयफ्रेंडनं तिच्या घरच्यांना हुंड्याची रक्कम आधीच दिली आहे. पण आता तो लग्न करत नाही आहे. तो लग्न कधी करणार याची वाट पाहून मी आता थकले आहे.

नगमानं हर्बर्टविरोधात कोर्टात धाव घेतली. त्याच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. हर्बर्टला आमच्या रिलेशनशिपचं गांभीर्य नाही. आता मला त्याच्यावर शंका येऊ लागल्या आहेत. त्याचं दुसऱ्या कुणासोबत तरी अफेअर असल्याचंही मला समजलं आहे. वाया माझा वेळ वाया घालवला आहे. आता माझं भविष्य काय असणार आहे, हे जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. असं म्हणत तिनं कोर्टाकडे न्याय मागितला आहे.

Published by: Priya Lad
First published: December 12, 2020, 4:48 PM IST

ताज्या बातम्या