OMG! उकळत्या तेलात हात घालून महिला तळतेय पदार्थ; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

OMG! उकळत्या तेलात हात घालून महिला तळतेय पदार्थ; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

उकळत्या तेलाच्या (hot oil) कढईसमोर आपल्याला उभंही राहवंत नाही. अशा तेलात पदार्थ सोडताना थोडा जरी थेंब हातावर उडाला तरी सहन होत नाही असं असताना ही महिला यात तेलात आपला संपूर्ण हात टाकून अगदी शांतपणे पदार्थ तळते आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : गरमागरम भजी, वडा प्रत्येकाला आवडतो. आता तर दिवाळी तोंडावर आली आहे, त्यामुळे चकली, करंज्या डोळ्यासमोर आहेतच. तळलेले हे पदार्थ खायला जितकी मजा येते तितकंच बनवण्याचा कंटाळा. कारण उकळत्या तेलात (hot oil) हे पदार्थ तळताना त्या तेलातून निघणारी वाफही नकोशी असते. त्यामुळे त्या कढईसमोरही उभं राहणं नकोसं वाटतं. पण विचार करा, जर एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर... साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

फर्स्ट व्ही फेस्ट या ट्विटर अकाऊंटवरून हा टिकटॉक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक महिला चक्क आपल्या हातानेच गरमागरम तेलात पदार्थ सोडून आपल्या हातानेच तळताना दिसते आहे.

व्हिडीओत पाहू शकता, एका कढईजवळ ही महिला उभी आहे. कढईतलं तेल गरम आहे, हे समजतंय कारण त्यातून बुडबुडे येत आहेत. ही महिला आपल्या हातातील एका भांड्यातून पदार्थ घेऊन तो या उकळत्या कढईत सोडते. एरवी आपण हाताने तेलात पदार्थ सोडल्यानंतर तो तळण्यासाठी चिमटा किंवा चमच्याचा वापर करतो. मात्र ही महिला आपल्या हाताच्या बोटांनी तेलात सोडलेले पदार्थ तळते आहे.

हे वाचा - हातात साप घेऊन उपदेश देणं फादरना पडलं महागात, पाहा श्वास रोखायला लावणारा VIDEO

आपल्याला व्हिडीओ पाहूनही विश्वास बसत नाही आहे. तर तिथं प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या लोकांनाही यावर विश्वास बसत नाही आहे. त्यावेळी महिलेनं कढईतील हे तेल आपल्या हातातही घेऊन दाखवल्याचं दिसतं. या तेलात हात घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील हावभावही बदलत नाही, ज्यावरून तिला चटके बसत असावेत, असं दिसेल. शिवाय तिच्या हातांवरही काही भाजल्याच्या खुणा दिसत नाही आहेत.

हे वाचा - मास्कवरून विमानात पती-पत्नीमध्ये WWF; पतीने शिवी देताच पत्नीनं लगावली कानशिलात

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नेटिझन्सनी महिलेच्या कलेला दाद दिली आहे. आपण असं याआधी कधीच पाहिलं नाही, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर एका ट्विटर युझरने कदाचित तिच्या हातावरील बॅटरमुळे तिला चटके जाणवत नसावेत, असं म्हटलं आहे.

Published by: Priya Lad
First published: October 27, 2020, 4:18 PM IST

ताज्या बातम्या