तारुण्य ते म्हातारपण, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर असा असावा महिलांचा आहार

तारुण्य ते म्हातारपण, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर असा असावा महिलांचा आहार

मासिकपाळी सुरू झाल्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत महिलांनी आहारात (Woman diet) बदल करत राहायला हवेत.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : तारुण्यात प्रवेश करताना आणि रजोनिवृत्ती येताना या कालावधीत महिलांच्या हार्मोन्समध्ये अनेक बदल होत असतात. या बदलांना सामोरं जाण्यासाठी महिलांना आहारही तितकाच गरजेचा असतो. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना आहाराबाबत जास्तीत जास्त सतर्क राहवं लागतं. त्यामुळे वयानुसार महिलांचा कसा आहार असावा ते पाहुयात.

तारुण्य

बालवयात मुलं आणि मुलींना सामान्यपणे सारखेच न्यूट्रिशन्स लागतात, त्यामुळे त्यांचा आहार सारखाच असतो. मात्र तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलींची आहाराची गरज बदलते.

आयर्न - या वयात मासिक पाळी येते आणि रक्तस्राव होतो. त्यामुळे आयर्नची गरज मोठ्या प्रमाणात भासते. तज्ज्ञांच्या मते 9 ते 13 वयोगटातील मुलींना दिवसाला 8 मिलीग्रॅम तर वयाच्या चौदाव्या वर्षापासून 15 मिलिग्रॅम आयर्नची गरज भासते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, मांसाहार, नट्स, बिन्स असा आहारा घ्यावा. शिवाय आयर्न फोर्डिफाइड सेरेल्स आणि ब्रेडही घेऊ शकता.

कॅल्शिअम - जसजसं वय वाढतं तसतसं हाडांची झीज होते. त्यामुळे कमी वयातच हाडं मजबूत ठेवणं गरजेचं आहे. 9 ते 18 वयोगटातील मुलींना दिवसाला 1,300 मिलिग्रॅम कॅल्शिअम गरजेचं असतं. त्यामुळे या वयात दूध, दही, चीज तसंच ब्रोकोली आणि कोबी यासारख्या कॅल्शिअमयुक्त भाज्या खाव्यात.

हेदेखील वाचा - पुरुषांपेक्षा महिलांना ‘या’ कॅन्सरचा सर्वाधिक धोका, लक्षणांबाबत माहिती असू द्या

प्रेग्नन्सी आणि आई झाल्यानंतर

प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या आरोग्यावर तुमच्या बाळाचं आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळे तुमच्या आहाराचा परिणाम बाळाच्या विकासावर होत असतो. अशावेळी आहाराबाबत जास्त जागरूक असायला हवं.

फोलेट - प्रेग्नन्सीमध्ये मेंदू आणि पाठीच्या मणक्यासंबंधित जन्मदोषाचा धोका टाळण्यासाठी व्हिटॅमिन बी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे भरपूर धान्य, फोर्टिफाइड सेरेल, पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक व्हिटॅमिन्स घ्या.

प्रोटिन - बाळाच्या वाढीसाठी प्रोटिन खूप गरजेचं आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, महिलेला दिवसाला 88 ग्रॅम प्रोटिन लागतं आणि स्तनपानावेळी 100 ग्रॅम. चिकन, मासे यामधून तुम्हाला प्रोटिन मिळेल. जर तुम्ही शाकाहारी असाल तर बिन्स, शेंगभाज्यांचा आहारात समावेश करा.

आयर्न - तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या रक्तपेशींसाठी आयर्न महत्त्वाचं आहे.  तुम्हाला थकवा जाणवणार नाही. आहारातून पुरेसं आयर्न मिळत नाही, त्यावेळी डॉक्टर आयर्न सप्लिमेंट देतात.

कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी - या दोन्ही घटकांमुळे हाडं आणि दात मजबूत होतात. दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या आणि इतर पदार्थांमधून तुम्हाला कॅल्शिअम मिळेल. मात्र व्हिटिमन डी तिम्हाला साल्मन मासा, फोर्टिफाइड दूध आणि ऑरेंज ज्युस अशा काही मोजक्याच पदार्थांमधून व्हिटॅमिन डी मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी तुम्हाला सूर्यप्रकाशात जावं लागेल, मात्र त्यावेळी त्वचेला हानी पोहोचणार नाही याचीही काळजी घ्या.

हेदेखील वाचा - महिलांनो, Breast ला येणाऱ्या खाजेकडे दुर्लक्ष नको; असू शकतं गंभीर आजारांचं लक्षण

रजोनिवृत्ती आणि त्यानंतर

रजोनिवृत्तीनंतर तुम्हाला काही घटक कमी लागतात तर काही जास्त. मासिक पाळी येत नाही, त्यामुळे आयर्नसारखे घटक तुम्हाला कमी लागतात तर कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी सारखे घटक भरपूर प्रमाणआत लागतात.

कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी - तुम्ही कमी वयात जे कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात घेतलं, त्याचा फायदा आता तुम्हाला होईल. या वयात तुमची हाडं ठिसूळ होत असतात. याशिवाय तुम्ही व्यायामही करत राहायला हवा.

फायबर - हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयाचे आजार, कॅन्सर अशा आजारांचा धोका कमी करण्यात मदत करतं. तसंच आतड्यांचं कार्यही सुरळीत राहतं. पन्नाशीनंतर तुम्हाला दिवसाला कमीत कमी २० ग्रॅम फायबर हवं असतं. त्यामुळे आहारात तुम्ही ताजी फळं, धान्यं, भाज्यांचा समावेश करा.

व्हिटॅमिन बी-6 - तुमच्या मेंदूचं कार्य योग्य राहावं त्यासाठी हे व्हिटॅमिन महत्त्वाचं आहे.चणे, मासे, चिकन अशा ब्रेन फूडमधून तुम्हाला हे घटक मिळतील. दिवसाला कमीत कमी 1.5 मिलिग्रॅम व्हिटॅमिन बी-6 तुमच्या शरीरात जाईल याची काळजी घ्या.

सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

First published: February 19, 2020, 1:57 PM IST
Tags: diet tips

ताज्या बातम्या