लंडन, 14 जानेवारी : आहार आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. पण काही विशिष्ट पदार्थ आपल्या आरोग्यासाठी घातकही ठरत असतात. ज्यामुळे मधुमेह, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक अशा आजारांचा धोका वाढतो. पण एखादा पदार्थ खाल्ला आणि लगेच त्याचा परिणाम झाला असं शक्यतो होत नाही. हे पदार्थ हळूहळू आपल्या परिणाम दाखवतात. पण एका महिलेने मात्र तिच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम करणारा पदार्थ खाल्ला आणि तिचा लगेच मृत्यू झाला (Woman heart attack after eating peanut halwa dessert).
यूकेच्या न्यूकॅसलमधील 31 वर्षांची हन्ना सकीगलाला (Hanna Scigala) मृत्यूने असं गाठलं ज्याचा कुणी विचारही केला नसेल. तिच्या मृत्यूच्या कारणाने सर्वांनाच धक्का दिला आहे (Woman died after eating peanut halwa dessert). हन्नाने आपल्या मुलांसोबत रात्रीचं जेवण केलं. त्यावेळी शेंगदाण्याचा गोड पदार्थ तिने खाल्ला. हाच पदार्थ तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
हे वाचा - Yuck! हे काय आहे? पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीच Pizza खाणार नाही
ही घटना 4 जानेवारीची आहे. रात्री 9 च्या सुमारास हन्नाने आपल्या मुलांसोबत रात्रीचं जेवण केलं. जेवणात गोड म्हणून शेंगदाण्याचा हलवा होता. हा हलवा खाल्ल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडू लागली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्याआधी रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. तिला रुग्णालयात नेलं तेव्हा तिचा मेंदू काम करत नसल्याचं दिसलं. त्यामुळे तिला लाइफ सपोर्टवरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला रस्त्यातच हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
हे वाचा - ब्रेस्टकडे पाहून पाळीव कुत्रा वारंवार करत होता इशारा; सत्य समजताच हादरली महिला
आता हलवा खाऊन असा अचानक मृत्यू कसा काय होऊ शकतो, असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. हन्नाची बहीण स्टेफनीने डेली मेल ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, हन्नाला नट्सची अॅलर्जी होती. त्यामुळे एखादा पदार्थ बनवला की ती खाण्याआधी त्यात काय काय आहे, हे नेहमी तपासलं जायचं. तरी हन्नाने शेंगदाण्याचा हलवा बनवला. तो का बनवला आणि बनवला तर का खाल्ला हे माहिती नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Heart Attack, Lifestyle