बेलफास्ट, 21 ऑक्टोबर : विमान (plane) प्रवासात प्रत्येक प्रवाशाला मास्क (mask) घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असताना मास्क न घालताच एक महिला विमानात चढली आणि तिला मास्क घालायला सांगितल्यानंतर तिने विमानात राडाच केला. इतकंच नव्हे तर सहप्रवाशांसमोर खोकून तिनं त्यांच्यावर थुंकण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना आहे आयर्लंडमधील बेलफास्ट इंटरनॅशनल एअरपोर्टवरील (Belfast International Airport). महिला प्रवाशी EasyJet च्या विमाननं प्रवास करणार होती. EZY481 विमानात ती चढली. बेलफास्टहून हे विमान एडिनबर्गला जाणार होतं. विमान चढताच विमातल्या कर्मचाऱ्यांनी तिला मास्क घालायला सांगितलं मात्र तिनं नकार दिला. त्यानंतर तिला तात्काळ विमानातून खाली उतरण्यास सांगण्यात आलं. मग तिनं धिंगाणाच घातला.
प्रत्येक जण मरणार आहे, असं म्हणत महिला नको ते बोलू लागली. इतकंच नव्हे तर विमानातून बाहेर पडताना ती सहप्रवाशांवर खोकली आणि तिनं थुंकण्याचाही प्रयत्न केला. विमानातील एका प्रवाशानं हा व्हिडीओ बनवला. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या महिलेला घटनेनंतर अटक करण्यात आल्याचं विनानतळ प्रशासनाने सांगितलं आहे.
हे वाचा - OMG! 9 महिन्यांची गर्भवती 5 मिनिटांत धावली 1.6 किमी; पाहा VIDEO
दरम्यान मास्कवरून विमानात राडा झाल्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी नेदरलँडच्या (Netherlands) ॲम्स्टरडॅममध्येही (Amsterdam) अशीच घटना घडली होती. मात्र इथं विमानात मास्क न घालणाऱ्या प्रवाशाला इतर प्रवाशांनी मारलं होतं.
स्पॅनिश बेट बलेरिक मधील इबीझाकडे जाणाऱ्या KLMच्या विमानात एका युवकाने मास्क घालण्यास नकार दिला. विमानात उपस्थित असलेल्या इतर सहप्रवाशांनी या युवकाला मास्क घालण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणाच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र सहप्रवाशांनी त्यांनाही मारण्यास सुरुवात केली. अखेर फ्लाइट स्टाफने मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.