ब्रिटन, 03 जून : लहानपणापासून आई-वडिलांचे एकुलते एक म्हणून तुम्ही मोठे झालात आणि अचानक तुम्हाला खूप भावंडं आहेत, असं समजलं तर साहजिकच मोठा धक्का बसेल. असंच काहीसं घडलं ते ब्रिटनमधील एका तरुणीसोबत. एकुलती एक म्हणून वाढलेली ही तरुणी अचानक 63 भावंडांची बहीण झाली.
ब्रिटनमधली 23 वर्षांची कियानी एरोयो (Kianni Arroyo). चार वर्षांची असताना तिच्या लक्षात आलं, की बाकी सगळ्या मुलांच्या घरात आई-वडील आहेत; आपले पालक मात्र दोन्ही स्त्रियाच आहेत. त्यामुळे तिला आपल्या वडिलांबाबत जाणून घेण्याची खूपच उत्सुकता होती.
पित्याबद्दलच्या फार थोड्या गोष्टी कियानीला माहिती होत्या. त्यांना कला आणि खेळांमध्ये रस होता. कियानीदेखील चित्रं काढायची, तसंच सर्फिंगचा खेळही खेळायची. तिच्या या आवडी पित्याकडून आलेल्या आहेत, असं तिला वाटायचं. कारण आईच्या कुटुंबात असं कोणी नव्हतं. पित्याकडून आपल्याला आणखी कोणकोणत्या गोष्टी मिळाल्यात, याबद्दल ती सतत विचार करत असायची. त्यानंतर ती टेस्ट ट्युब बेबी (test tube baby) असल्याचं समजलं.
टेस्ट ट्यूब बेबीसारख्या तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षांत स्त्री-पुरुषांच्या मीलनाशिवायही गर्भ तयार होऊ शकतो. वंध्यत्व असलेल्या दाम्पत्यांना, तसंच गे किंवा लेस्बियन दाम्पत्यांनाही मूल होण्याचा पर्याय त्यामुळे उपलब्ध झाला आहे. अर्थात, यात स्पर्म डोनर (Sperm Donor) अर्थात शुक्राणू दात्याची भूमिका महत्त्वाची असते. एक स्पर्म डोनर अनेक वेळा स्पर्म्सचं दान करू शकतो. वास्तविक, त्या स्पर्मपासून जन्म घेणारी मुलं त्याच्याकडे राहणार नसली किंवा रूढार्थाने त्याची मुलं नसली, तरी जैविकदृष्ट्या ती त्या डोनरचीच मुलं असतात, हे सत्य नाकारता येत नाही. त्यातून नात्यांची गुंतागुंत होऊ नये, या दृष्टीने काही कायदे-नियमही तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्म डोनरची ओळख उघड केली जात नाही. अर्थात हे कायदे आणि नियम वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे आहेत. त्यामुळे काही काळानंतर स्पर्म डोनरची ओळख पटू शकते.
हे वाचा - Shocking! सेक्स डॉलशी लग्न करणाऱ्या बॉडीबिल्डरने डेटिंगसाठी घातली विचित्र अट
कियानीने आपल्या स्पर्म डोनर वडिलांचा शोध कसाही घ्यायचाच याचा चंगच बांधला. आपल्याला आपले कोणते गुणधर्म पित्याकडून मिळालेत, हे जाणून घेण्यासाठी कियानी उत्सुक होती.
द मिररच्या रिपोर्टनुसार कियानीने स्पर्म बँकेशी (Sperm Bank) संपर्क साधला. त्यानंतर तिला आवश्यक ती माहिती मिळाली. तिला फक्त आपल्या वडिलांबाबतच नव्हे तर भावंडांबाबतही माहिती झाली. 15 वर्षांची असताना तिचा एका कुटुंबाशी संपर्क आला होता. त्या महिलेला जुळ्या मुली होत्या. त्यांचा जन्मही तिच्या पित्याच्या स्पर्मपासूनच झाल्याचं तिला कळलं. त्या लहानग्या मुलींशी खेळून तिला खूप बरं वाटलं होतं. त्यामुळेच आपण अन्य भावंडांना शोधण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं.
कियानीचा जन्म ज्यांच्या स्पर्मपासून झाला, त्या व्यक्तीने आपलं प्रोफाइल खासगी ठेवलं होतं. त्यामुळे त्यांच्या स्पर्मपासून जन्म झालेल्या मुलांना त्यांच्याशी संपर्क साधता येणं शक्य नव्हतं. तरीही कियानी आपल्या त्या अज्ञात पित्यासाठी लहानपणापासूनच फादर्स डेचं कार्ड तयार करायची. त्यांना ती खूप मिस करायची. दरम्यानच्या काळात, एका डोनर कंपनीसाठी कियानीने एक प्रमोशनल व्हिडिओ केला. तो पाहिल्यानंतर तिच्या पित्याने आपला विचार बदलून प्रोफाइल पब्लिक केलं.
हे वाचा - इवल्याशा हातांनी भरभर कापतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून हैराण व्हाल
स्पर्मचं दान केल्यानंतर ते विशिष्ट भौगोलिक भागातच वापरले जातात असं काही नाही. त्यामुळे आपल्या भावंडांचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर कियानीला आपली ही भावंडं अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांत पसरलेली असल्याचं समजलं. आतापर्यंत तिला 63 जणांचा शोध लागला आहे. त्या सर्वांचा जन्म कियानीच्या पित्याच्या स्पर्मपासूनच झाला आहे. कियानी फ्लोरिडात (Florida) राहते आणि त्या शहरात तिची 12 भावंडं राहतात. कोरोनाची साथ संपल्यानंतर कियानी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या भावंडांचा शोध घेणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Lifestyle, Relationship, Sex, Sexual health