OMG! नकली EYELASH लावणं पडलं महागात; आंधळी झाली महिला

OMG! नकली EYELASH लावणं पडलं महागात; आंधळी झाली महिला

फॅशन, स्टाइल आणि सुंदर दिसण्याच्या नादात अशी किंमत मोजावी लागेल याची कल्पनाही कुणी केली नसेल.

  • Share this:

ब्राझिलिया, 04 ऑक्टोबर : आपल्याला जसे ओठ, गाल, नाक, डोळे हवेत तसं मेकअपच्या सहाय्याने मिळतात. अगदी डोळ्यांच्या पापण्यांवरही बाहुलीच्या डोळ्याप्रमाणे केस हवेत तर त्यासाठी नकली आयलॅशेस (Eyelashes) उपलब्ध आहेत. सध्या असेच नकली आयलॅश वापरण्याचं प्रमाण वाढतं आहे आणि असेच आयलॅशेस वापरणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

ब्राझीलच्या रोंडोनियामध्ये 41 वर्षीय महिलेने नकली आयलॅशेस लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे ती आंधळी झाली आहे. तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. तर दुसऱ्या डोळ्याने तिला धूसर दिसू लागलं आहे.

ही महिला डोळ्यांच्या पापण्यांवर नकली आयलॅशेस लावण्यासाठी ब्युटी सलूनमध्ये गेली. आयलॅशेस लावण्यासाठी जो ग्लू वापरला जातो तो तिच्या डोळ्यामध्ये पडला. त्यानंतर तिच्या डोळ्यात वेदना झाल्या आणि नंतर तिला एका डोळ्याने दिसणं बंद झालं, असा दावा या महिलेनं केला आहे.

द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार ब्राझीलच्या जी1 वृत्तपत्राच्या बातमीनुसार महिलेने याबाबत पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली. तिने सलूनमधील ब्युटिशियनकडून आपल्या डोळ्यात ग्लू पडल्याचं सांगितलं. त्यानंतर तिच्या डोळ्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. ब्युटिशिअनने तिला एक ग्लास पाणी दिलं आणि त्यानंतर ही महिला घरी निघून आली.

हे वाचा - अतिशहाणपणा नडला! मोठ्या स्टारसारखे डोळे बनवण्याच्या नादात आंधळी झाली मॉडेल

महिलेच्या डोळ्यातील वेदना कमी झाल्या नाहीत म्हणून ही महिला डॉक्टरांकडे गेली. आपल्याला एका डोळ्याने काहीच दिसत नाही तर दुसऱ्या डोळ्याने धूसर दिसत असल्याचं तिनं सांगितलं. तिची डोळ्यांची दृष्टी तात्पुरती गेली की कायमची हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आता महिलेच्या बहिणाने कोर्टात धाव घेतली आहे.

याआधीदेखील एका मॉडेलने एका स्टारसारखे डोळे हवेत म्हणून डोळ्यांमध्ये टॅटू करून घेतला. आयबॉल टॅटू केल्यानंतर ही मॉडेलची दृष्टीही गेली आहे. तिची दृष्टी परत येईल, याची आशा नसल्याचं डॉक्टरांनाही सांगितलं आहे. या महिलेच्या डोळ्यांमध्ये टॅटू करण्यासाठी जी शाई वापरू नये तिच शाई वापरली गेली. इथंदेखील टॅटू डिझायनरच्या चुकीची किमत या मॉडेलला मोजावी लागली. फॅशनच्या नादात मॉडेलचा अतिशहाणपणा चांगलाच नडला.

हे वाचा - काय म्हणावं आता? सर्वात मोठे ओठ हवेत म्हणून 20 वेळा सर्जरी; अन् ओठांची अक्षरश: वाट लावली

त्यामुळे तुम्हीदेखील फॅशन, स्टाइल आणि सुंदर दिसण्याच्या नादात असं काही करत असाल तर काळजी घ्या. नाहीतर हा नाद चांगलाच भारी पडेल, याची ही दोन उदाहरणं तुमच्यासमोर आहेत.

Published by: Priya Lad
First published: October 4, 2020, 8:24 AM IST

ताज्या बातम्या