केमिकलचा वापर न करता पांढरे केस होतील काळे

केमिकलचा वापर न करता पांढरे केस होतील काळे

छोटासा दिसणारा आवळा शरिरासाठी आणि केसांसाठी खूप गुणकारी आहे. हा खाण्याने किंवा केसांना लावल्याने सुद्धा केस काळे होतात.

  • Share this:

19 जुलै:आजकाल पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे. हे टाळण्यासाठी कित्येक जण हेअर कलर, हेअर डायचा वापर करतात. पण त्यामुळे केस कमकुवत बनून गळतात. तर काही जणांना अॅलर्जीसुद्धा होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर सूज येणे, डोक्यात खाज सुटणे अशा समस्या निर्माण होतात. तर बघू या कोणत्या या घरगुती उपायांमुळे अशा केसांची कशी काळजी घेतली जाईल.

आवळा

छोटासा दिसणारा आवळा शरिरासाठी आणि केसांसाठी खूप गुणकारी आहे. हा खाण्याने किंवा केसांना लावल्याने सुद्धा केस काळे होतात. याचा नियमित वापर केल्यामुळे पांढऱ्या केसांचा नायनाट होतो. आवळ्याला फक्त डाएटमध्येच समाविष्ट करू नका तर, मेंहदीमध्येसुद्धा मिसळून केसांना कंडिशनिंग करा किंवा आवळ्याचे बारीक तुकडे गरम खोबरेल तेलात मिक्स करुन केसांना लावा.

काळ्या केसांसाठी गुणकारी काळी मिरची

गुणकारी काळी मिरची तुमच्या पांढऱ्या केसांना काळे करण्यास मदत करते. केसांना शॅम्पू लावल्यावर काळ्या मिरचीचे दाणे पाण्यात उकळवून हे पाणी केस धुवायला वापरा. असं नियमित केल्याने लवकरच तुम्हाला फरक दिसेल.

ब्लॅक टी आणि कॉफी केसांसाठी फायदेशीर

ब्लॅक टी आणि कॉफी हे पेय सर्वांचे आवडीचे आहे. जर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या आहे तर याचे नियमित सेवन करा,किंवा ब्लॅक टीच्या अर्कने केस धुवा त्यामुळे पांढरे होणारे केस काळे होताना दिसून येतील. दोन दिवसांतून एकदा हे केल्याने फरक दिसून येईल.

केसांसाठी गुणकारी कोरफड

कोरफड केसांच्या आणि त्वचेच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. कारण ही केसांना मजबूत बनवते, त्यामुळे पांढऱ्या केसांना काळे होण्यास मदत होते. कोरफड जेलमध्ये लिंबूचा रस टाकून पेस्ट बनवून केसांना आणि मुळांना लावा. हे नियमित लावल्याने पांढरे केस काळे होतील.

First published: July 19, 2017, 6:10 PM IST

ताज्या बातम्या