मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Dry Hand Problem : हातांचा कोरडेपणा सतावतोय? या घरगुती उपायांनी हात होतील मऊ

Dry Hand Problem : हातांचा कोरडेपणा सतावतोय? या घरगुती उपायांनी हात होतील मऊ

बऱ्याच लोकांना कोरड्या आणि निर्जीव हातांचा त्रास होतो. यावर सहज उपचार घरच्या घरी शक्य आहे. घरातील काही वस्तू जसे की, मध आणि खोबरेल तेलाचा वापर करून हातांची कोरडेपणा दूर केला जाऊ शकतो.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 3 ऑगस्ट : मऊ आणि मुलायम हात कोणाला नको असतात. मात्र बदलते हवामान आणि कामामुळे हात कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. मधुमेह किंवा ल्युपससारख्या समस्यांमुळे हात निर्जीव आणि कोरडे दिसू शकतात. हात कोरडे होणे ही एक सामान्य समस्या आहे. आपल्या शरीरातील हात हा असा एक अवयव आहे जे दिवसभरातील प्रत्येक कामात आपली मदत करतात. त्यांना निरोगी आणि मुलायम बनवण्यासाठी आपणदेखील काहीतरी केले पाहिजे. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय तुम्हाला तुमचे हात मऊ बनवण्यास मदत करू शकतात. खोबरेल तेल, कोरफड, मध यांसारख्या घरगुती वस्तू आपल्या हातांचा हरवलेला मुलायमपणा परत मिळवू शकतात. चला जाणून घेऊया अशाच काही घरगुती उपायांबद्दल जे हात मऊ होण्यास मदत करतात. हातांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय शुगर स्क्रब स्टाइलक्रेझनुसार, डेड स्किन सेल्समुळे हात कोरडे होतात. अशा परिस्थितीत शुगर स्क्रबच्या वापराने हात पुन्हा मऊ होऊ शकतात. अर्धा चमचा खोबरेल तेल १ चमचा साखरेत मिसळून हातावर हलके मसाज करा. नंतर आपले हात धुवा आणि मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. असे आठवड्यातून 1-2 वेळा केल्याने हाताचा मऊपणा परत येऊ शकते.

Hair Care Tips : त्वचेसोबत केसही चमकदार आणि निरोगी ठेवते मुलतानी माती, केसांवर असा करा वापर

खोबरेल तेल नारळाच्या तेलामध्ये त्वचेला हायड्रेट करण्याचा गुणधर्म असतो. रोज रात्री हाताला खोबरेल तेल लावा आणि हातमोजे घालून झोपा. जेणेकरून तेल हातालाच राहील. कोरफड कोरड्या हाताची समस्या हाताला कोरफड लावून दूर करता येते. 15-20 मिनिटांसाठी हातांवर जेल लावा आणि कोमट पाण्याने धुवा. व्हॅसलीन व्हॅसलीन एक उत्कृष्ट मॉइश्चरायझिंग एजंट आहे. रोज रात्री हातावर व्हॅसलीन लावून झोपल्याने हात मऊ राहतात. मध मधामध्ये त्वचेला हायड्रेट आणि गुळगुळीत करणारे घटक असतात, ज्यामुळे हातांना आर्द्रता मिळते. दररोज 15-20 मिनिटे मधाची मसाज केल्याने हात मुलायम आणि हायड्रेट होतात. Mattress for beauty sleep : कोणत्या ब्युटी प्रोडक्टपेक्षा कमी नाही ही खास मॅट्रेस; झोपेतच खुलवते तुमचं सौंदर्य अंड्याचा बलक अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये लेसिथिन असते, ज्याचा उपयोग त्वचेचा कंडिशनिंग एजंट म्हणून केला जातो. आठवड्यातून 3-4 वेळा हे हाताला लावल्याने हात मऊ होतात.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Skin care

पुढील बातम्या