या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर केस गळती कधीच थांबणार नाही!

फार कमी लोकांना माहीत आहे की शरीरात 5 व्हिटॅमिन कमी झाल्यास त्याचा सरळ परिणाम केस गळण्यावर होतो.

  • Share this:

केस गळणं ही हल्ली सगळ्यांचीच समस्या झाली आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की शरीरात 5 व्हिटॅमिन कमी झाल्यास त्याचा सरळ परिणाम केस गळण्यावर होतो.

व्हिटॅमिन ए - केसात तेलाचं प्रमाण चांगलं राहण्यासाठी अ जीवनसत्त्वाची गरज लागते. त्यामुळे केस लांबसडक आणि मजबूत राहतात. अर्थात, ए व्हिटॅमिनचा अति वापरही टाळावा. पालक, गाजर यात ए व्हिटॅमिन जास्त असते.

व्हिटॅमिन बी - व्हिटॅमिन बीमुळे केसाची चमक चांगली राहते. शिवाय केसांची वाढ होण्यासाठीही याचा उपयोग होतो. मशरूम, अंडी यात व्हिटॅमिन बी असतं.

व्हिटॅमिन सी - यामुळे शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढते. अॅलर्जीही होत नाही. दुबळे झालेले केस यामुळे मजबूत होतात. स्ट्राॅबेरी, संत्र, मोसंबं, द्राक्ष, किवी यात जास्त सी जीवनसत्त्व असतं.

व्हिटॅमिन डी - सूर्यप्रकाशात फिरल्यानं शरीरातलं डी जीवनसत्त्व वाढतं. केसांच्या वाढीसाठी ते पोषक आहे. त्यामुळे रोज माॅर्निंग वाॅक केला,तर केसांना चांगलं.

व्हिटॅमिन ई - तुटणाऱ्या केसांसाठी व्हिटॅमिन ई अतिशय उपयोगी आहे. त्यानं केस तुटण्याचे थांबतात आणि मजबूत दिसतात. बदाम, ब्राॅकली यात ई व्हिटॅमिन भरपूर असतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 08:29 AM IST

ताज्या बातम्या