Health Tips- ऑफिसमध्ये पॅनिक अटॅक आला, तर हे उपाय नक्की करा, वाचेल जीव

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण या आजाराने त्रस्त आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 05:11 PM IST

Health Tips- ऑफिसमध्ये पॅनिक अटॅक आला, तर हे उपाय नक्की करा, वाचेल जीव

मुंबई, 31 जुलै- ऑफिसमध्ये काम करताना अचानक तुम्हाला हृदयाचे ठोके वाढल्यासारखं कधी वाटलं का... यासोबतच अस्वस्थ वाटणं, घाम येणं यांसारख्या गोष्टीही तुमच्यासोबत कधी झाल्या का.. जर झाल्या असतील तर त्याला पॅनिक अटॅक असं म्हटलं जातं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण या आजाराने त्रस्त आहेत.

अचानक भिती वाटणं किंवा अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला उत्तेजित करण्याला प्रवृत्त करणं यामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो. विशेष म्हणजे फारशी तणावयुक्त परिस्थिती नसताना तसेच हासभास नसतानाही पॅनिक अटॅक कधीही येऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीनुसार याची लक्षणं वेगळी असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, सुमारे 56 दशलक्ष लोक हे डिप्रेशनशी दोन हात करत आहेत तर सुमारे 38 दशलक्ष लोकांना अनझायटी डिसॉर्डर आहे.

सर्वसामान्य लक्षणं-

मनात काही तरी होणार असल्याची भावना येणं

श्वास घ्यायला त्रास होणं

Loading...

गुदमरल्यासारखं वाटणं

पॅरास्थेसिया (मुंग्या येणं)

हृदयाचे ठोके वाढणे

घाम येणं

छातीत दुखणं

स्वतःवरचं नियंत्रण गमावणं

थरथरल्यासारखं होणं

थंडी वाजणं

डोकं दुखणं, चक्कर येणं

मळमळणं

ऑफिसमध्ये पॅनिक अटॅक आला तर या गोष्टी नक्की करा-

तुम्ही जिथे आहात तिथे शांत बसा.

मनाला सतत समजवा की यात घाबरण्यासारखं काही नसून अवघ्या काही मिनिटांत हा अटॅक जाईल.

हायपरव्हेंटिलेशन होऊ नये यासाठी हळू आणि दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या. नाकाने घेतलेला श्वास संपूर्ण छातीत आणि पोटापर्यंत जाऊ दे. यानंतर तोंडावाटे श्वास सोडा.

पॅनिक अटॅक आल्यावर डोळे बंद करा आणि शांत बसा.

स्वतःला शांत करण्यासाठी छोटे व्यायाम करा.

सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा तसेच चांगल्या गोष्टींचा अधिकाधिक विचार करा.

तसेच पॅनिक अटॅक थांबला नाही तर तत्काळ मदत मागण्यासाठी हातात महत्त्वपूर्ण गोष्ट ठेवा.

वैद्यकीय उपचार- पॅनिक अटॅक जर वारंवार येत असतील तर तातडीने त्यावर वैद्यकीय उपचार घ्या. योग्य निदान झालं तर त्यावर उपचार घेता येतील. तसेच नेमकी कोणत्या गोष्टींमुळे पॅनिक अटॅक येतो याचं निरीक्षणही करा. तसेच योग्य व्यायामामुळेही यावर नियंत्रण मिळवता येतं. पण असं असलं तरी कोणते व्यायाम आणि योग साधना करावी यासंबंधीत तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

जेव्हा पाण्यात चक्क पाच मजली इमारत वाहते, पाहा VIDEO

संध्याकाळी रडल्यावर कमी होतो लठ्ठपणा, संशोधनात झालं सिद्ध!

झोपण्याच्या या 4 पोझिशनमुळे शरीराला होतात अनेक फायदे!

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...