Home /News /lifestyle /

हिवाळ्यात कोरडेपणामुळं चेहऱ्याची चमक कमी झालीय? मग या टिप्स करा फॉलो, त्वचा राहील मुलायम

हिवाळ्यात कोरडेपणामुळं चेहऱ्याची चमक कमी झालीय? मग या टिप्स करा फॉलो, त्वचा राहील मुलायम

Winter skin care : थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी पडून फुटल्यासारखी होते. अशा स्थितीत त्वचा केवळ कोरडीच नाही तर, निर्जीव आणि रंगहीन दिसते.

    नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : हवामानात बदल होत असताना कोरड्या हवामानाचा त्वचेवरही (skin) परिणाम होऊ लागतो. हिवाळ्यात त्वचेच्या समस्यांपैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे त्वचेचा कोरडेपणा  (Dryness) . थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी पडून फुटल्यासारखी होते. अशा स्थितीत त्वचा केवळ कोरडीच नाही तर, निर्जीव आणि रंगहीन दिसते. त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसण्याची समस्यादेखील तीव्र होते. उदा., सुरकुत्या आदी. अशा परिस्थितीत हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं (Winter skin care tips) असतं. त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन तुम्ही त्वचा सतत चमकदार ठेवू शकता. हिवाळ्यात त्वचेला अशा प्रकारे ठेवा कोरडेपणापासून दूर हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं असतं. सहसा या ऋतूत आपल्याला तहान कमी लागते. मात्र, जर दिवसभरात पाणी योग्य प्रमाण प्यायले किंवा इतर पातळ पदार्थांचे चांगल्या प्रमाणात सेवन केलं (कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक्स सोडून) तर तुमच्या त्वचेचा ओलावा कायम राहील. अशा स्थितीत हिवाळ्यात पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी पिणं आवश्यक आहे. 2. मॉइश्चरायझर लावा या ऋतूमध्ये त्वचेवर मॉइश्चरायझरचा वापर करणं खूप गरजेचं आहे. याचा वापर केल्यानं त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि त्वचा कोरडी होत नाही. व्हिटॅमिन-ई असलेलं मॉइश्चरायझर वापरल्यास उत्तम. 3. खोबरेल तेल वापरणं खोबरेल तेल त्वचेचं पोषण करण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. त्वचा निरोगी बनवण्यासोबतच ते त्वचेचं आरोग्य सुधारून टोनलाही संतुलित करतं. आंघोळ करताना खोबरेल तेलानं मालिश करू शकता. असं केल्यानं तुमची त्वचा दिवसभर चमकदार राहील. हे वाचा - विदारक! पोलिसांच्या ताब्यात असताना विवाहितेचा मृत्यू, हुंडाबळीची करूण कहाणी 4. सौम्य स्क्रब वापरा हिवाळ्यात, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही सौम्य स्क्रब वापरू शकता. याच्यामुळं मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात आणि त्वचा चमकदार बनते. तुम्हाला हवं असल्यास दही, बेसन आदींपासून घरी सौम्य स्क्रब बनवून वापरू शकता. 5. दूध साफ करणे कोरड्या आणि कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सकाळी निरसं दूध वापरू शकता. त्यात कापूस बुडवून त्वचेवर लावा. असं केल्यानं त्वचेमध्ये नैसर्गिक पद्धतीनं आर्द्रता टिकून राहते. हे वाचा - TATA AIA Life Insurance नवीन 100 डिजीटल ब्रांच सुरु करणार, 10000 हून अधिक नोकरीच्या संधी 6. लिपबाम आवश्यक हिवाळ्यात ओठ फुटू नयेत म्हणून नैसर्गिक लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकता. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. हिंदी न्यूज 18 याची पुष्टी करत नाही. हे लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Skin care

    पुढील बातम्या