मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Winter Skin Care: हिवाळ्यातही तुमची त्वचा राहील कोमल, मुलायम; फक्त या गोष्टींची काळजी घ्या

Winter Skin Care: हिवाळ्यातही तुमची त्वचा राहील कोमल, मुलायम; फक्त या गोष्टींची काळजी घ्या

Winter Skin Care Tips : थंडीमध्ये त्वचेचवरील नैसर्गिक तेल कमी होतं आणि त्वचा कोरडी होते. अशा स्थितीत त्वचेची काळजी घेताना, ऋतूनुसार तुमच्या त्वचेला अनुकूल अशी सौदर्यं उत्पादने वापरा. हिवाळा येताच काही गोष्टी अजिबात वापरू नयेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : हिवाळ्याच्या हंगामात आपल्याला त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये त्वचेचवरील नैसर्गिक तेल कमी होतं आणि त्वचा कोरडी होते. अशा स्थितीत, त्वचेची काळजी घेताना, ऋतूनुसार तुमच्या त्वचेला अनुकूल अशी उत्पादने वापरा. हिवाळा येताच काही गोष्टी अजिबात वापरू नयेत. त्यांच्या वापरामुळे त्वचा कोरडी होते आणि वृद्धत्वाची समस्या देखील (Winter Skin Care Tips) उद्भवू शकते.

विंटर स्किन केअर टिप्स - हिवाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात

1. साबणाचा वापर कमी करा

हिवाळ्यात साबणाने आंघोळ केली तर त्वचा कोरडी पडते. साबण त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकते आणि त्यामुळे त्वचा मोठ्या प्रमाणात कोरडी होते. इतकेच नाही तर अनेक साबणांमध्ये खूप जास्त pH असते ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे त्वचेवर खाज आणि कोरडेपणा वाढतो. जर तुम्ही साबण लावत असालच तर त्वचेवर लोशन किंवा बॉडी ऑइल लावणे गरजेचे आहे.

2. एक्सफोलिएट करू नका

एक्सफोलिएटिंगद्वारे त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे काम होते, परंतु जर ते जास्त केले गेले तर त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात एक्सफोलिएटिंग कमी करा.

हे वाचा - Bigg Boss Marathi: विशाल-विकासमध्ये पुन्हा पडली वादाची ठिणगी; टास्कदरम्यान झाला तुफान राडा

3. सुगंधी उत्पादनांचा वापर

हिवाळ्यात फ्रॅग्रन्स क्लीनर, मॉइश्चरायझर किंवा सिरम वापरणे टाळा. कारण जेव्हा तापमान कमी होते तेव्हा त्यामुळे त्वचेवर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ऍलर्जी, खाज सुटणे इत्यादी अडचणी वाढतात.

4. त्वचा कोरडी करणारे फेस मास्क नको

हिवाळा आला की अनेकजण क्ले मास्क, मुलतानी माती आणि बेसन वापरतात. त्यामुळं त्वचा जास्त कोरडी होते. याच्या वापरामुळे त्वचेचा पीएच खराब होतो आणि त्वचा आतून कोरडी आणि निर्जीव होते. अशा परिस्थितीत तुम्ही कोरफड, एवोकॅडो आणि दुधापासून बनवलेला फेस मास्क वापरल्यास अधिक चांगला फायदा होईल.

हे वाचा - PM Kisan: खूशखबर! शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर

5. अल्कोहोल आधारित उत्पादने टाळा

अल्कोहोल आधारित टोनर किंवा कोणतीही स्किन केयर प्रोडक्‍ट तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अल्कोहोल आधारित टोनरचा त्वचेला त्रास होऊ शकतो, जळजळ आणि खाज सुटू शकते. त्याऐवजी, तुम्ही गुलाबपाणी आणि ग्लिसरीन असलेली उत्पादने वापरू शकता. त्यामुळं, हिवाळ्यात अशा गोष्टी निवडा ज्यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट होईल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Winter session