• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Diwali Vacation: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ट्रिप प्लॅन करतायत? 'ही' आहेत बजेट डेस्टिनेशन्स

Diwali Vacation: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ट्रिप प्लॅन करतायत? 'ही' आहेत बजेट डेस्टिनेशन्स

यंदाच्या दिवाळीत 'या' पर्यटनस्थळी भेट देऊन करा मजा मस्ती, वाचा बजेट डेस्टिनेशन्स

यंदाच्या दिवाळीत 'या' पर्यटनस्थळी भेट देऊन करा मजा मस्ती, वाचा बजेट डेस्टिनेशन्स

Diwali Vacation: या वर्षी दिवाळीला मिळत असलेल्या सलग सुट्ट्यांचा वापर करून एक रिफ्रेशिंग ट्रिप पूर्ण करण्याचा योग आहे. तुमच्या सुट्ट्या आणि बजेटचा मेळ घालून वरीलपैकी एका ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : दसरा हा सण झाला की, थंडीची (winter season) चाहूल लागते. पावसाळ्यानंतर येणारा थंडीचा ऋतू बहुतेकांना आवडतो. गुलाबी थंडीमध्ये विविध ठिकाणी भटकंती करण्याची मजा काही औरच असते नाही? साधारण थंडीच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिवाळी हा सण देखील येत असतो. परिणामी विद्यार्थी आणि नोकरदारांना सुट्ट्या (Vacation) मिळतात. या काळात अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी सण आला आहे. 4 (गुरुवार) नोव्हेंबरला दिवाळीची सुट्टी असून 5 (शुक्रवार) नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे. यानंतर 6 (शनिवारी) नोव्हेंबरला पुन्हा भाऊबीजेची सुट्टी आहे. तर ७ नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे नियमित सुट्टी आहे. एकूणच सलग चार दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. त्यानंतर पुन्हा 10 तारखेला छठपूजेला सुट्टी असेल. अशा स्थितीत 8 आणि 9 तारखेला सुट्ट्यांचा जुगाड करून सलग सुट्ट्या मिळवण्याचा प्रयत्न करता आला तर एक चांगली आठवडाभराची ट्रिप करता येऊ शकते. ज्यांच्या डोक्यामध्ये अशा ट्रिपची कल्पना आहे अशांसाठी कमी खर्चात (10 हजार रुपयांच्या आत) भेट देता येईल अशा 8 सर्वोत्तम पर्यटन स्थळांची (Tourist places) माहिती खाली दिली आहे. सोनमर्ग (काश्मीर) - साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हलकी थंडी जाणवते. अशा परिस्थितीत, तुम्ही काश्मीरच्या निसर्गरम्य पर्वतरांगांना भेट देण्याचा विचार करू शकता. सोनमर्ग (Sonamarg) हे नवविवाहित जोडप्यांसाठी एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन (Honeymoon Destination) आहे. काश्मीरमधील पर्वतरांगा, बागा आणि विविध लहान-मोठी सरोवरं त्याच्या सौंदर्यात भर घालतात. काश्मीरमधला दल सरोवर (Dal Lake) जगप्रसिद्ध आहे. जर, तुम्ही जास्तचं नशीबवान असाल तर तुम्हाला या ठिकाणी हिमवर्षाव देखील अनुभवता येऊ शकतो. वाचा : कसं शक्य आहे? म्हणे, 'जितका जास्त खर्च तितकी जास्त पैशांची बचत', महिलेची विचित्र Saving Tips तीर्थन व्हॅली (हिमाचल प्रदेश) - निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅली (Tirthan Valley) एक सर्वोत्तम पर्याय आहे. या ठिकाणी स्वर्गीय वातावरणाचा अनुभव घेता येतो. तीर्थन व्हॅली हिमालय राष्ट्रीय उद्यानापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ट्राउट माशांसाठी (Trout Fish) लोकप्रिय आहे. जवळपास 10 हजार रुपये खर्च करून तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. बीर बिलिंग (हिमाचल प्रदेश) - दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे लोक 4 ते 5 दिवसांत बीर बिलिंगला (Bir Billing) भेट देण्याचा प्लॅन करू शकतात. हिमाचल प्रदेशमध्ये असलेलं हे सुंदर ठिकाण पॅराग्लायडिंग, ट्रेक सारख्या साहसी क्रीडा प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय याठिकाणी मेडिटेशन (Meditation) देखील करता येते. येथील ठिकाणांमध्ये तुम्हाला तिबेटी संस्कृतीची झलक पहायला मिळेल. 10 हजार रुपयांच्या खर्चामध्ये ही मिनी ट्रिप करू शकता. हृषीकेश (हरिद्वार) - धार्मिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हृषीकेश (Rishikesh) हे एक उत्तम ठिकाण आहे. गंगा घाट (Ganga Ghat) आणि कलात्मक मंदिरं हे याठिकाणचं प्रमुख आकर्षण आहेत. येथील मंदिरांमध्ये रात्री होणारी आरती पर्यटकांना आकर्षित करते. हृषीकेशपासून जवळ असलेल्या शिवपुरीलाही तुम्ही भेट देऊ शकता. तिथे राफ्टिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि बंजी जंपिंगचा आनंद घेता येतो. वाचा : तुम्ही खाऊन खाऊन थकाल पण पदार्थ संपणार नाहीत; खिशाला परवडणाऱ्या दरात या हॉटेलमध्ये मिळतं Unlimited food औली (उत्तराखंड) - औली (Auli) हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकणारी सोनेरी हिरवळ आपलं मन प्रसन्न करून टाकते. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. हनिमूनसाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचा मुक्तपणे आनंद घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि खर्च दोन्ही वाढवावे लागतील. रानीखेत (उत्तराखंड) - उत्तराखंडमध्ये वसलेलं रानीखेत (Ranikhet) हे एक सुंदर हिल-स्टेशन आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडत असेल तर तुम्ही या नोव्हेंबरच्या सुट्ट्यांमध्ये रानीखेतला भेट देऊ शकता. याठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग, बाईक रायडिंग, राफ्टिंगचा देखील आनंद घेऊ शकता. रानीखेतमधील झुला देवी मंदिर (Jhula Devi Temple) देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही त्याला देखील भेट देऊ शकता. मुक्तेश्वर (Mukteshwar) (उत्तराखंड) - उत्तराखंडमधील मुक्तेश्वर (Mukteshwar) हे ठिकाण निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे जाऊन तुम्ही स्वच्छ आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. याशिवाय ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बाइकिंग, राफ्टिंगची देखील या ठिकाणी सुविधा आहे. वाचा : Apple Shape: सफरचंदाचा आकार का असतो असा? जाणून घ्या मजेशीर Facts माउंट अबू (राजस्थान) - माउंट अबू (Mount Abu) हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. या ठिकाणाला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. कामाच्या व्यापातून आराम आणि शांतता पाहिजे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. नाक्की सरोवर येथील सौंदर्यात भर घालते. या वर्षी दिवाळीला मिळत असलेल्या सलग सुट्ट्यांचा वापर करून एक रिफ्रेशिंग ट्रिप पूर्ण करण्याचा योग आहे. तुमच्या सुट्ट्या आणि बजेटचा मेळ घालून वरीलपैकी एका ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता.
  First published: