मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Winter Health Tips : हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळणं होईल सोपं, फक्त खा हे पदार्थ

Winter Health Tips : हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळणं होईल सोपं, फक्त खा हे पदार्थ

हिवाळ्यात आपल्याला गरम गरम पदार्थ खाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे. मात्र चवीच्या नादात आपण तळलेले, गोड असे पदार्थ खाणेच योग्य नाही. हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश खूप आवश्यक आहे.

हिवाळ्यात आपल्याला गरम गरम पदार्थ खाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे. मात्र चवीच्या नादात आपण तळलेले, गोड असे पदार्थ खाणेच योग्य नाही. हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश खूप आवश्यक आहे.

हिवाळ्यात आपल्याला गरम गरम पदार्थ खाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे. मात्र चवीच्या नादात आपण तळलेले, गोड असे पदार्थ खाणेच योग्य नाही. हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश खूप आवश्यक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 15 नोव्हेंबर : हिवाळ्याचा उल्लेख करताच आपल्या मनात सर्वप्रथम काय येतं? उबदार ब्लँकेट, हॉट चॉकलेट किंवा मस्तपैकी गरमागरम गाजराचा हलवा बऱ्याच लोकांच्या मनात हे सर्व येतं. हिवाळ्यात आपल्याला गरम गरम पदार्थ खाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे. मात्र चवीच्या नादात आपण तळलेले, गोड असे पदार्थ खाणेच योग्य नाही. हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश खूप आवश्यक आहे.

    हिवाळ्यात आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी आपला आहार योग्य असणं खूप आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत. जे तुम्हाला हेल्दी तर ठेवतीलच. त्यासोबतच तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवतील. हिवाळ्यात ताजे, सेंद्रिय, पचायला सोपे आणि पौष्टिक पदार्थ खावे.

    हसण्यावारी घेऊ नका! सतत पोटातून येणारा गुडगूड आवाज म्हणजे गंभीर आजार

    हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी खा हे पदार्थ

    चीज, अंडी आणि मासे

    हे पदार्थ प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी 12 ने भरपूर असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिनचे प्रमाण आवश्यक आहे. तुमच्या सँडविच आणि करीमध्ये चीज घाला. टोस्टसह उकडलेले अंडे किंवा स्क्रॅम्बल्ड एग बनवून खा. करीमध्ये, फ्राईड राईस किंवा कटलेट बनवताना माशांचा समावेश करा. हे जेवण थकवा कमी करते आणि ऊर्जा वाढवते.

    भाज्या

    बटाटे, सलगम आणि रताळी यांचा आहारात समावेश करा. रताळे फायबर, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियमने समृद्ध असतात. हे बद्धकोष्ठतेस मदत करतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि जळजळीपासून मुक्त करतात. सलगममध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन के असतात. तुमच्या आहारात ब्रोकोली, मशरूम, मुळा, बीन्स आणि गाजर यांचाही समावेश करा. तुम्हाला उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही भाज्यांचे सूप बनवू शकता. या काळात मेथी आणि पालकचे पराठेही खाणे फायदेशीर आहे.

    खजूर

    खजूरमध्ये कमी फॅट्स असतात. हे वजन कमी करण्यास मदत करू शकते. हिवाळ्यात, शरीराचे तापमान कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हे जीवनसत्व, खनिज आणि अँटिऑक्सिडंट सामग्रीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. हिवाळ्यात पोषक तत्वांचे हे पॉवरहाऊस आवश्यक आहे कारण ते तुम्हाला उबदार ठेवेल. खजूर खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

    बाजरी

    बाजरीत लोह, फॅट्स, प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. हे हिमोग्लोबिन पातळी आणि अॅनिमियामध्ये मदत करू शकते. तुम्ही बाजरीच्या पीठाच्या भाकरी बनवून खाऊ शकता. तुमच्या लापशी किंवा खिचडीमध्येही बाजरी घालू शकता.

    Winter Tips : हिवाळ्यात तुम्ही सर्रास करत आहात ही चूक; किडनी कामातून गेलीच समजा

    मसाले

    हिवाळ्यातील खाद्यपदार्थांमध्ये मोहरी, काळी मिरी, मेथी आणि ओवा यांसारख्या मसाल्यांचा समावेश करा. हे मसाले रोगप्रतिकारशक्ती, सर्दी, खोकला, फ्लू, पचनक्रिया आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उत्कृष्ट आहेत. आलं, लवंगा, दालचिनी हळद, आणि जिरेही घाला. हे मसाले अन्नात सुगंध आणतात आणि पदार्थाची पौष्टिकताही वाढवतात.

    (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

    First published:

    Tags: Food, Health, Health Tips, Heart Attack, Lifestyle