मुंबई, 16 नोव्हेंबर : हिवाळा सुरु झाला की, आपल्याला आपल्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. अन्यथा वेगवेगळे आजार आणि संसर्गाचा धोका वाढतो. हिवाळ्यात केवळ आरोग्याचं संभाळावे लागते असे नाही. तर त्वचेचीदेखील तितकीच काळजी घ्यावी लागते. त्यामुळे लोकही आपल्याला खूप वेगवेगळे सल्ले देत असतात. हिवाळ्यात खाय काय खावं याबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. मात्र हिवाळ्यात काय खाऊ नये. याचा विचार केलाय?
हिवाळ्यात काही पदार्थ खाणे आपण टाळले पाहिजे. तसेच काही पदार्थ एकत्र खाणेही टाळावे. काही पदार्थ एकत्र खाल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यांना हिवाळ्यातील बॅड फूड कॉम्बिनेशन्स म्हणतात. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातील हे बॅड फूड कॉम्बिनेशन्स कोणते आहेत आणि ते का खाऊ नये याबद्दल माहिती देणार आहोत.
Winter Health Tips : हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळणं होईल सोपं, फक्त खा हे पदार्थ
हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका हे 4 फूड कॉम्बिनेशन्स
ताक आणि आंबट फळं : हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, आंबट म्हणजेच लिंबूवर्गीय फळं व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात आणि ताकही आंबट असते. त्यामुळे हे दोन पदार्थ एकत्र घेतल्याने घशाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. म्हणून ताक आणि लिंबूवर्गीय फळं कधीही एकत्र खाऊ नये, हिवाळ्यात तर अजिबात नाही.
डाळ आणि कोबी : हिवाळ्यात कोबी किंवा ब्रोकोली डाळींसोबत खाणे टाळावे. कारण डाळीमुळे शरीरात गॅस तयार होतो आणि कोबीमूलदेखी गॅसची समस्या उद्भवते. जेव्हा हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले जातात. तेव्हा शरीरात खूप गॅस आणि पोटफुगी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो हे पदार्थ वेगवेगळेच खावे आणि दिवसा खावे. तुम्ही दही किंवा बेसनासोबतही हे पदार्थ खाऊ शकता.
मद्य आणि मिठाई : अनेकांना मद्यपानाची सवय असते. त्यासोबत लोकांना खूप वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असते. काही लोकांना दारूसोबत मिठाई खायला आवडते. मात्र हे कॉम्बिनेशन हिवाळ्यात तुमच्यासाठी घातक ठरू शकते. हे दोन पदार्थ एकत्र घेतल्यावर तुमच्या शरीरात आंबायला लागतात. त्यामुळे तुमच्या मेंदूची क्रिया आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
Winter Tips : हिवाळ्यात तुम्ही सर्रास करत आहात ही चूक; किडनी कामातून गेलीच समजा
हंगामी भाज्या आणि फळं : हिवाळ्यात हंगामी पालेभाज्यांसोबत फळं खाऊ नये. या दिवसांमध्ये व्हिटॅमिन सीयुक्त फळं उपलब्ध असतात. मात्र हिवाळ्यात हंगामी भाज्या आणि फळं एकत्र खाल्यास शरीरात अल्कधर्मी (अल्कलाईन) आणि आम्लयुक्त (ऍसिडिक) द्रव दोन्ही मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात. त्यामुळे अपचन होऊ शकते. त्यामुळे भाज्या आणि फळं एकत्र खाणे टाळावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Winter