मुंबई, 12 नोव्हेंबर : हिवाळा येताच लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू होतो. यामागे त्यांची कमकुवत प्रतिकारशक्ती हे एक कारण म्हणता येईल. म्हणूनच कोणत्याही ऋतूमध्ये मुलांचा आहार पौष्टिक आणि संतुलित असणं खूप आवश्यक असता. जर आपण मुलांच्या रोजच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा म्हणजेच अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश केला तर हिवाळ्यातही मुलं निरोगी राहतील.
वारंवार येणाऱ्या आजारपणामुळे मुले अशक्त होऊ लागतात. सर्दी, खोकला आणि ताप त्यांना पुन्हा पुन्हा त्रास देऊ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही हिवाळ्यातील ज्यूसबद्दल सांगत आहोत, जे मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात कोणत्या गोष्टींचा ज्यूस तुम्ही तुमच्या मुलांना द्यावा.
Cooking Oil : कॅन्सर, डायबिटीज अशा अनेक आजारांना दूर ठेवते हे तेल; स्वयंपाकासाठी उत्तम पर्याय
हिवाळ्यात मुलांना द्या हे 5 ज्यूस
डाळिंबाचा ज्यूस : डाळिंबाचा रस शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतो. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हा ज्यूस बनवण्यासाठी डाळिंब सोलून त्यातील दाण्यांचा ज्यूस तयार करा. नंतर या रसात थोडे काळे मीठ टाकून मुलांना द्या.
गाजर-टोमॅटोचा रस : गाजर आणि टोमॅटो मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत. ते चवीलाही खूप छान लागते. हे बनवण्यासाठी तुम्ही एक गाजर आणि टोमॅटो घ्या आणि त्याचा रस काढा. आता त्यात आल्याचा छोटा तुकडा घालून बारीक करा. याचे सेवन केल्याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने वाढते.
गाजर, बीट, सफरचंद ज्यूस : गाजर, बीट आणि सफरचंदमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पचनक्रियाही चांगली राहते. ते बनवण्यासाठी आधी सोलून ज्युसरमध्ये टाकून त्याचा ज्यूस तयार करा. आता त्यात थोडे काळे मीठ टाकून ताजे प्यायला द्या.
संत्री आणि गाजर ज्यूस : संत्रा आणि गाजरच्या मिश्रित रसामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने हंगामी आजार दूर राहतात आणि मुलांची भूकही वाढते. हे करण्यासाठी एक गाजर आणि अर्धी संत्री घेऊन त्याचा ज्यूस तयार करा आणि त्यात काळे मीठ टाका.
मुलं नाकात का बोटं घालतात ते समजून घ्या; नुसतं त्यांच्यावर रागावून नाही जाणार सवय
सफरचंद ज्यूस : अनेक मुलांना सफरचंद खायला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही त्याचा रस काढून त्यांना देऊ शकता. यासाठी ज्युसरमध्ये त्याचा रस काढा आणि त्यात थोडासा लिंबाचा रस घाला. यामध्ये भरपूर फायबर, लोह आणि मॅग्नेशियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात, जे मुलांच्या विकासासाठी देखील खूप फायदेशीर असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fruit, Health, Health Tips, Lifestyle, Parents and child, Winter