मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Winter Health Tips : वजन कमी करण्यासाठी असे खा मेथी दाणे, शुगरही राहील नियंत्रित

Winter Health Tips : वजन कमी करण्यासाठी असे खा मेथी दाणे, शुगरही राहील नियंत्रित

बसून काम करणाऱ्यांची संख्या हल्ली वाढते आहे. हिवाळ्यात आपल्या शारीरिक क्रिया आणखी मंदावतात. त्यामुळे आहारात बदल करून निरोगी राहणं आवश्यक आहे. हिवाळ्यात एक पदार्थ तुम्हाला सर्वार्थाने निरोगी ठेऊ शकतो. ते म्हणजे मेथीचे दाणे.

बसून काम करणाऱ्यांची संख्या हल्ली वाढते आहे. हिवाळ्यात आपल्या शारीरिक क्रिया आणखी मंदावतात. त्यामुळे आहारात बदल करून निरोगी राहणं आवश्यक आहे. हिवाळ्यात एक पदार्थ तुम्हाला सर्वार्थाने निरोगी ठेऊ शकतो. ते म्हणजे मेथीचे दाणे.

बसून काम करणाऱ्यांची संख्या हल्ली वाढते आहे. हिवाळ्यात आपल्या शारीरिक क्रिया आणखी मंदावतात. त्यामुळे आहारात बदल करून निरोगी राहणं आवश्यक आहे. हिवाळ्यात एक पदार्थ तुम्हाला सर्वार्थाने निरोगी ठेऊ शकतो. ते म्हणजे मेथीचे दाणे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 नोव्हेंबर : बदलत्या जीवनशैलीमध्ये आहार ही खूप महत्वाची गोष्ट बनली आहे. वजन वाढणे आणि मधुमेह, बीपी या त्रासांनी अनेकजण प्रभावित होत असतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांची जीवनशैली बैठी आहे. म्हणजेच बसून काम करणाऱ्यांची संख्या हल्ली वाढते आहे. हिवाळ्यात आपल्या शारीरिक क्रिया आणखी मंदावतात. त्यामुळे आहारात बदल करून निरोगी राहणं आवश्यक आहे.

हिवाळ्यात एक पदार्थ तुमचे आरोग्य जपण्यासाठी उत्तम असतो. ते म्हणजे मेथीचे दाणे. खूप वर्षांपासून मेथीचा वापर आयुर्वेदिक उपचारांमध्ये केला जातो. मेथीच्या दाण्यांचे सेवन आपले वजन कमी करण्यास प्रभावी आहे. त्याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे, त्वचेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठीही मेथीचा वापर होतो. मेथीचा प्रभाव उष्ण असल्याने हिवाळ्यात मेथीचा अधिक वापर केला जातो.

Winter Health Tips : हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळणं होईल सोपं, फक्त खा हे पदार्थ

मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. एक चमचा मेथीमध्ये 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम प्रोटीन आणि 1 ग्रॅम फॅट आढळते. याशिवाय लोह, मॅंगनीज, मॅग्नेशियम आदी घटकही मेथीमध्ये आढळतात. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांनी 10 दिवस दररोज 50 ग्रॅम मेथीचे सेवन केले. तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आश्चर्यकारकपणे कमी होते. यासोबतच खराब कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.

दुसऱ्या एका अभ्यासात असे आढळून आले की मेथी खाल्ल्यानंतर 4 तासांनंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. मेथीमध्ये भरपूर फायबर असते. याशिवाय यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या दूर करण्यात मदत करतात.

अशाप्रकारे करा मेथीच्या दाण्यांचे सेवन

पाण्यात भिजवून : स्टाइलक्रेझने दिलेल्या माहितीनुसार, मेथीचे दाणे पाण्यात भिजवून तुम्ही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 1 टेबलस्पून मेथी दाणे, 2 ग्लास पाणी लागेल. मेथीचे दाणे दोन ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या. वजन कमी करण्यासाठी ओले मेथीचे दाणे रिकाम्या पोटी चावून खा किंवा 250-500 मिली मेथीचे पाणी प्या.

मेथीचा चहा : मेथीच्या दाण्यांचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला 1 टीस्पून मेथी दाणे, 1 कप पाणी, दालचिनी किंवा आलं लागेल. सर्वप्रथम मेथीच्या दाण्यांची ग्राइंडरमध्ये पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळून त्यात ही पेस्ट घाला. चवीनुसार दालचिनी किंवा आलं घाला.

झाकण ठेऊन मंद आचेवर चहा 5 मिनिटे उकळू द्या. तयार झाल्यावर रिकाम्या पोटी हा मेथीचा चहा प्या.

हसण्यावारी घेऊ नका! सतत पोटातून येणारा गुडगूड आवाज म्हणजे गंभीर आजार

मेथी आणि मध एकत्र घ्या : मिक्सरमध्ये मेथीच्या दाण्यांची कोरडी खडबडीत पेस्ट बनवून घ्या. एका पातेल्यात पाणी उकळून त्यात मेथीची पावडर टाका. हे मिश्रण थंड होऊ द्या आणि तीन तास विश्रांती घ्या. त्यानंतर एका कपात पाणी गाळून घ्या. यामध्ये मध आणि लिंबाचा रस घाला. चांगल्या परिणामांसाठी दररोज सकाळी हे प्या.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips, Winter