मुंबई, 27 नोव्हेंबर : सध्या हिवाळा ऋतू (Winter Season) सुरू झाला असून, हवेमध्ये गारवा वाढला आहे. या ऋतूमध्ये उबदारपणा राखण्यासाठी आपलं शरीर अधिक ऊर्जेचा वापर करतं (Winter health tips). ऊर्जानिर्मितीसाठी (Energy generation) आणि चयापचय क्रिया (Metabolism) वाढविण्यासाठी अधिक पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. याशिवाय हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती (Immune system) काहीशी कमजोर होते. म्हणून हिवाळ्यात पौष्टिक आणि समृद्ध अन्नपदार्थांची निवड करणं गरजेचं ठरतं. या ऋतूत नेमके कोणते अन्नपदार्थ खावेत, असा प्रश्न पडणं साहजिक आहे.
दररोज सकाळी एक टेस्टी डिटॉक्स ड्रिंक (Detox drink) पिणं, हा एक उत्तम पर्याय आहे. डिटॉक्स ड्रिंक्समुळे शरीरातले विषारी घटक बाहेर पडून वजन कमी करण्यास, चयापचय वाढवण्यास, पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचा आणि केसांचा पोतही सुधारतो.
संत्री, गाजर आणि आल्याचा रस : संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि व्हिटॅमिन सी असतं, तर गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी हे दोन्ही घटक मदत करू शकतात. आल्यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी (Antiinflammatory) गुणधर्म असतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी, आतड्यांची सूज आणि पोटदुखी कमी करण्यासाठी आलं उपयुक्त ठरतं.
हे वाचा - रोज एक कप कॉपी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत भरपूर फायदे; योग्य वेळ जाणून घ्या
आवळ्याचा रस : आवळ्याच्या (amla) रसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यासाठी आवळा मदत करतो. याशिवाय सर्दी आणि खोकल्यासारख्या व्हायरल (Viral) व बॅक्टेरियल (Bacterial) संसर्गांपासूनही आवळा संरक्षण करतो.
डाळिंब आणि बीटचा रस : डाळिंब आणि बीटाच्या रसामध्ये डिटॉक्सिफायिंग (Detoxifying) गुणधर्म असतात. याशिवाय बाजारात मिळणाऱ्या या रसामध्ये अॅलो व्हेरा अर्थात कोरफडीचं जेल असतं. त्यामुळं तुमची प्रतिकारशक्ती आणखी मजबूत होण्यास मदत होते.
पालक, गाजर आणि सफरचंदाचा रस : गोड गाजर, सफरचंद आणि पालकाचं (Spinach) मिश्रण काहीसं विचित्र वाटू शकतं. परंतु ते अनेक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतं.
हे वाचा - सावधान! हिवाळ्यात अधिकच वाढतो Heart Attack चा धोका; अशाप्रकारे घ्या काळजी
आलं, लिंबू आणि मधाचा चहा (ginger tea) : घसा खवखवणं आणि सर्दीवर उपचार करण्यासाठी गेल्या अनेक शतकांपासून या पेयाचा वापर केला जातो. आलं, मध आणि लिंबाचा वापर करून हा चहा तयार केला जातो. याशिवाय याचे इतर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
वरील सर्व पेयं बनवण्यासाठी अतिशय सोपी आहेत. घरच्या घरी तुम्ही ती सहज तयार करू शकता.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Winter