मुंबई, 27 नोव्हेंबर : मुरंबा म्हटलं की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. हिवाळ्यात मुरंबा खाण्याची मजाच और असते. हिवाळ्यात तशी तर आपल्याला आपल्या तब्येतीची खूप काळजी घ्यावी लागते. विशेषतः ज्या लोकांना बीपी किंवा डायबिटीजचा त्रास आहे त्यांना. मात्र मुरंबा आपल्या आरोग्यासाठी खरं तर अतिशय लाभदायक असतो, असे मानले जाते.
मुरंब्यामध्ये असलेले अनेक पोषक घटक मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, हृदयाच्या समस्या आणि पचनाच्या समस्यांसह अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. तुम्ही हा मुरंबा बाहेरूनही विकत घेऊ शकता किंवा स्वतः घरी देखील बनवू शकता. परंतु घरी बनवताना त्यात साखरेऐवजी गूळ वापरा. जाणून घेऊया हिवाळ्यात कोणता मुरंबा खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. याबद्दलचे वृत्त झी न्यूजने प्रकशित केले आहे.
डायबिटिजसोबत अनेक त्रासांपासून मिळेल आराम, फक्त दुधात मिसळून प्या हा पदार्थ
हिवाळ्यात मुरंबा खाण्याचे फायदे
सफरचंदचा मुरंबा : सफरचंदाच्या मुरंबामध्ये फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात. त्यामुळे हा मुरंबा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हा मुरंबा खाल्ल्याने सुरकुत्या, केस गळणे, निद्रानाश आणि डोकेदुखीची समस्या दूर होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. हा मुरंबा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा खाऊ शकता.
आवळ्याचा मुरंबा : आवळ्याचा मुरंब्यामध्ये झिंक, क्रोमियम, कॉपर आणि व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. हा मुरंबा खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने त्वचेचा रंग सुधारतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनाही हा मुरंबा फायदेशीर मानला जातो.
गाजराचा मुरंबा : हिवाळ्यात गाजराचा मुरंबा खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. या मुरंबामध्ये व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे गाजराचा मुरंबा खाल्ल्याने दृष्टी वाढते. तसेच गाजराचा मुरंबा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य ठेवण्यासाठी मदत करतो, तसेच उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतो. हा मुरंबा खाल्ल्याने भूक वाढते आणि पोटातील जळजळीची समस्या दूर होते.
तुम्ही कधी ग्रीन कॉफी प्यायलात? लोकांना वेड लावणाऱ्या या कॉफीचे फायदे वाचून थक्क व्हाल!
बेलाचा मुरंबा : बेलाचा मुरब्बा देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. यात फायबर, आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतात. हा मुरंबा खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या दूर होतात. याशिवाय वाढते वजन, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा मुरंबा खूप फायदेशीर मानला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Food, Health, Health Tips, Lifestyle, Winter