Home /News /lifestyle /

फिट राहण्यासाठी Cycling करत आहात का? मग या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

फिट राहण्यासाठी Cycling करत आहात का? मग या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

Winter Cycling Tips : सायकल चालवण्याआधी तुम्ही या टिप्स लक्षात ठेवल्या तर, त्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यासोबतच सायकल चालवताना होणार्‍या कोणत्याही त्रासापासून शरीराचं रक्षण होऊ शकतं.

    नवी दिल्ली, 02 डिसेंबर: हिवाळ्यात फिटनेस (fitness) राखण्यासाठी सायकलिंग हा एक चांगला व्यायाम आहे. या ऋतूत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी हलक्या व्यायामासोबत सायकल चालवणं खूप उपयुक्त आहे. हिवाळा (Winter Season) हा फक्त खाण्यापिण्याचा ऋतू नसून आपल्या आरोग्याची काळजी (Health Care) घेण्याचाही ऋतू आहे. हिवाळ्यात आरोग्य राखण्यासाठी काही जण वर्कआउट (Workout) करतात. तर, काही जण चालणं पसंत करतात. तथापि, मोठ्या संख्येनं लोक सायकलिंगही करतात. कडाक्याच्या थंडीत शरीरातून घाम गाळून शरीरात ऊर्जा भरून ठेवण्यासाठी सायकलिंग हा एक चांगला (Winter Cycling Tips) व्यायाम आहे. जर तुम्हाला नियमित व्यायामाचा कंटाळा आला असेल आणि सायकल चालवायची असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. सायकल चालवण्याआधी तुम्ही या टिप्स लक्षात ठेवल्या तर, त्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यासोबतच सायकल चालवताना होणार्‍या कोणत्याही हानीपासून शरीराचं रक्षण करण्यात मदत होऊ शकते. या टिप्स लक्षात ठेवा (Cycling in Winter Tips) 1. जर तुम्ही सायकल चालवायला सुरुवात करत असाल तर ती चांगल्या स्थितीत असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्या आसन-स्थितीकडे (Seat) विशेष लक्ष द्या. आसन बदलण्याची गरज असल्यास ते बदलून घ्या. सायकल चालवताना, मध्येच सीटवरून उठून पुन्हा बसावे किंवा काही काळ उभं राहून सायकल चालवावी. यामुळं सायकलच्या सीटसोबत शरीराचं घर्षण झाल्यामुळं होणाऱ्या रॅशेसची (saddle sores) किंवा कटिप्रदेशातील हाडं दुखण्याची समस्या उद्भवणार नाही. 2. सायकल चालवताना शक्य तितकं सरळ बसण्याचा प्रयत्न करा. यासोबतच तुमचे खांदे आरामदायी स्थितीत ठेवा. जर तुम्ही दीर्घकाळ एकाच स्थितीत सायकल चालवत असाल तर, मान अवघडू शकते आणि मानेचं दुखणं सुरू होऊ शकतं. 3. आरोग्य सुधारण्यासाठी, जर तुम्ही सायकल चालवण्यास सुरुवात करत असाल, तर अशी सायकल निवडा ज्याचं हँडल अधिक सरळ स्थितीत असतील. गोल आकाराचे हँडल असल्यानं कंबर बराच वेळ वाकवावी लागते. यामुळे पाठीला दुखापत होण्याचा धोका वाढतो. काही दिवसांत पाठदुखीच्या तक्रारीही समोर येऊ शकतात. हे वाचा - मीठामुळे अनेक वास्तू दोष होतात दूर; पण या चुका करणं पडू शकतं महागात, वाचा योग्य पद्धत 4. जर तुम्ही सायकल चालवायला सुरुवात करत असाल तर तुमच्या आरामाची काळजी नक्की घ्या. यासाठी सर्वात आधी पायात नीट बसणारे आणि आरामदायी शूज घाला. यामुळं तुम्हाला लांब पल्ल्याची सायकल चालवणं सोपं होईलच. शिवाय, तुमचे पायही सुरक्षित राहतील. 5. सायकल चालवण्याआधी, तुमच्या उंचीनुसार सीट योग्य उंचीवर बसवणं आवश्यक आहे. सीटची उंची खूप जास्त किंवा खूप कमी नसावी. तुमचे दोन्ही पाय जमिनीला योग्य प्रकारे स्पर्श करू शकतील अशा प्रकारे सीट लावून घ्या. असं केल्यानं तुम्ही गुडघ्याच्या दुखापतीपासूनही वाचू शकता. हे वाचा - या 5 राशीचे लोक चुका करण्यात असतात एक्सपर्ट, मोठं नुकसान झाल्यावरच घेतात धडा 6. सायकल चालवल्यानं, पाय, पिंडऱ्या आणि मांड्या यांच्या स्नायूंवर सर्वाधिक भर पडतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सुरुवातीला लांब अंतरासाठी सायकल चालवली असेल, तर तुम्ही तुमच्या पायाच्या स्नायूंना नक्की मालिश करा. सायकल चालवल्यानं स्नायूंवर अधिक ताण येतो. मालिश केल्यानं वेदना कमी होतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या