• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Winter Care: हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी अंजीर आणि दूध प्या; मिळतील जबरदस्त फायदे

Winter Care: हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी अंजीर आणि दूध प्या; मिळतील जबरदस्त फायदे

Winter Care: हिवाळा हा आरोग्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. अंजीर दुधासोबत खाल्ल्यानं (Anjeer with milk) त्याचे फायदे दुप्पट होतात. हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि अंजीराचं सेवन केल्यास याचे अनेक फायदे (Winter Care) आहेत.

 • Share this:
   नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यातही अंजीर (Anjeer) हे फळ बहुगुणी आहे. अंजीर अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं ए, सी, ई, के, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि तांबं यांचा चांगला स्रोत आहे. जे रक्तदाब आणि साखर नियंत्रित ठेवते. मात्र, वाळलेल्या अंजीरामध्ये ताज्या अंजीरांपेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजं असतात. हिवाळा हा आरोग्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. अंजीर दुधासोबत खाल्ल्यानं (Anjeer with milk) त्याचे फायदे दुप्पट होतात. हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि अंजीराचं सेवन केल्यास याचे अनेक फायदे (Winter Care) आहेत. हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी अंजीर आणि दूध प्या; मिळतील जबरदस्त फायदे अंजीर-दूध कसं बनवावं हे अत्यंत स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेय असून झोपेच्या वेळेस ते घ्यावं. एक ग्लास दूध उकळवा आणि त्यात 3 सुके अंजीर घाला. आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊन वरून २-३ केशर घाला. (केशर उष्ण गुणधर्माचं आहे) हिवाळ्यात हे पेय तुमच्या शरीराला आवश्यक पोषण देईल. याशिवाय, अर्धा कप गरम पाण्यात अंजीर भिजवून नंतर ते अर्धा कप दुधात उकळूनदेखील तुम्ही त्याचं पेय तयार करू शकता. अंजीर तुम्ही चावूनदेखील खाऊ शकता. तुम्ही ते ओट्स मिल्क किंवा बदाम दूध यासारख्या पर्यायांसह देखील पिऊ शकता. याव्यतिरिक्त, वाळलेल्या अंजीरमध्ये सुक्रोजचे प्रमाण ताज्या अंजीरांपेक्षा जास्त असतं. त्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास मधुमेही व्यक्तींसाठी चांगला पर्याय असू शकत नाही. त्यांनी अशा प्रकारचं पेय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. हे वाचा - Government Jobs: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ इथे विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्याची शेवटची तारीख अंजीर आणि दुधाचे फायदे झोपण्यापूर्वी अंजीर आणि गरम दूध प्यायल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. हाडं आणि दातांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. याच्यामुळं मेंदूसह आरोग्याला चालना मिळते. अंजीर आणि दुधामुळं जळजळ कमी होते. सांधे आणि स्नायू वेदनाही कमी करते. पचनक्रिया सुधारते. हे वाचा - जाड दिसू नये असं वाटत असेल तर कपडे घेताना ‘ही’ घ्या काळजी; मिळेल एकदम परफेक्ट लुक अंजीर दुधात मिसळून तयार केलेलं पेय आरोग्यदायी असून ते प्रथिनं, दुधातील स्निग्धांश आणि खनिजांनी समृद्ध आहे. ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन नावाच्या घटकांमुळं चांगली झोप लागते. (सूचना- ही माहिती वैद्यकीय क्षेत्रातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: