Home /News /lifestyle /

लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळा आलाय; फक्त एका क्लिकवर करा जगाची सफर

लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळा आलाय; फक्त एका क्लिकवर करा जगाची सफर

कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) दररोज तुमच्या घरातील खिडकी आणि बाल्कनीतून एकच दृश्यं पाहून बोअर झालात. तर तुमच्यासाठी ही वेबसाइट फायद्याची ठरेल.

    मुंबई, 18 जुलै : कोरोनाव्हायरसच्या (CORONAVIRUS) या परिस्थितीत आपण घराच्या चार भिंतीत कैद झालो आहोत. ना शेजाऱ्यांकडे जाणं, ना प्रवास, ना आऊटडोर मिटींग, ना कॅफे, ना मित्रमैत्रिणींच्या घरी पार्टी. सर्व सर्व काही थांबलं आहे. कोरोना लॉकडाऊन (CORONA LOCKDOWN) काही प्रमाणात शिथील झाला आहे. काही देशांमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र तरी आपलं घर हेच आपल्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपलं घर आणि घराच्या चार भिंतीत खिडकीतून, बाल्कनीतून दिसणारं एकच दृश्य आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो आहे. मात्र आता तुम्हाला एका क्लिकवर घरबसल्या जगाची सफर करता येणार आहे. WindowSwap वेबसाईट तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणार आहे. जगभरातील लोकं सध्या लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त झालेले आहेत आणि या लोकांच्या घरातील खिडकीतून कसं दृश्यं दिसतं हे तुम्हाला एका क्लिकवर पाहता येणार आहे. तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलच्या स्क्रिनच्या खिडकीतून तुम्ही इतर ठिकाणच्या लोकांच्या घरातील खिडकीतून समोर कसं दृश्यं दिसतं आहे ते पाहू शकता. यामुळे तुम्हाला इतर ठिकाणी गेल्याचा फिल येईल. हे वाचा - Jioने सादर केला जादूचा चष्मा! JioGlass वापरून मिळणार थेट भेटीचा 3D अनुभव हे दृश्यं म्हणजे फक्त फोटो नाही तर एक छोटा रेकॉर्डेड व्हिडीओ आहे. ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष असल्याचा अनुभव मिळेल. लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असलेल्या अशाच लोकांनी आपल्या घराच्या खिडकीतून पाठवलेली ही दृश्यं आहेत. ज्यामध्ये कुठे ऊन तर कुठे पाऊस आहे, कुठे दिवस तर कुठे रात्र आहे. हे पाहून तुम्हाला इतर ठिकाणी फिरल्याचा आनंदही मिळेल. तुम्हीदेखील तुमच्या खिडकीतून कसं दृश्यं दिसतं याचा 10 मिनिटांचा व्हिडीओ तुम्ही सबमिट करू शकता. सिंगापूरमध्ये राहणारे या वेबसाईटचे संस्थापक सोनाली रंजित आणि वैष्णव बालासुब्रमण्यम यांनी याला क्वारंटाइन प्रोजेक्ट असं म्हटलं आहे. कॅम्पिअन एशिया पॅसिफिकशी बोलताना रंजित यांनी लॉकडाऊन ब्लूजशी लढण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पतीने या विंडो स्वॅपची निर्मिती केली आहे. विंडो स्वॅप म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न जाता प्रवास आहे. हे वाचा - अंतराळवीर होण्याचं स्वप्न करा साकार! फक्त एका क्लिकवर अंतराळ स्थानकात पोहोचा चला तर मग घरबसल्या जगाच्या सफरीसाठी तयार आहात का? जगातील इतर लोकांच्या घराच्या बाल्कनीतून किंवा खिडकीतून नेमकं दृश्यं कसं दिसतं हे पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Lifestyle, Lockdown, World After Corona

    पुढील बातम्या