लोकल ट्रेनमध्ये 2 तास उभं राहून कमी होईल वजन? इथे घ्या जाणून

लोकल ट्रेनमध्ये 2 तास उभं राहून कमी होईल वजन? इथे घ्या जाणून

आता ट्रेनमध्ये तुम्हाला सीट मिळाली नाही तर त्रास करून घेऊ नका. कारण आता ट्रेनमध्ये दोन तास उभे राहिलात तर वजन कमी होऊ शकतं.

  • Share this:

मुंबईकरांना ट्रेनमध्ये बसायला लगेच सीट मिळाली तर त्याहून दुसरं सुख कोणतं नसतं. पण तेच जर ऑफिसचा प्रवास उभं राहून करावा लागला तर पूर्ण दिवस त्रासातच जातो. पण आता ट्रेनमध्ये तुम्हाला सीट मिळाली नाही तर त्रास करून घेऊ नका. कारण आता ट्रेनमध्ये दोन तास उभे राहिलात तर वजन कमी होऊ शकतं. एका नवीन संशोधनानुसार दररोज उभं राहिल्याने शरीरातील कॅलरी कमी होण्यास मदत मिळते. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार दररोज दोन तास उभं राहिलं तर कमीत कमी 50 कॅलरी कमी होतात.

वीएलसीसीचे संस्थापक प्रमुख वंदना लूथरा यांनी मुंबईमध्ये स्टँड अप अभियानाची सुरुवात करताना म्हटलं की, 26 नोव्हेंबरला लठ्ठपणा प्रतिबंध दिनाच्या दिवशी देशभरात उभं राहून काम करण्याच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. यासाठी जनजागृती आणि पदयात्रासारखे कार्यक्रमही होतील. वंदना म्हणाल्या की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना जीमला जायला आणि नियमित व्यायाम करायला वेळ मिळत नाही.

अशावेळी थोडं उभं राहूनही तुम्ही वजन कमी करू शकता. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार जगभरात 39 टक्के तरुणांचं वजन जास्त असून त्यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर लठ्ठपणा येऊ शकतो. भारतात 3 टक्के पुरुष आणि 5 टक्के महिला हे लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. पुढच्या दोन वर्षात हा आकडा दुपट्टीने वाढण्याची शक्यता आहे. एनएसएसओ रिपोर्टनुसार भारतात पुरषांच्या लठ्ठपणाच्या दरात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या रिपोर्टनुसार भारतात पाचपैकी एक मुलगा लठ्ठपणाच्या आजाराने त्रस्त होत आहे. वंदना लूथरा यांच्या मते, स्टँड अप इंडिया अभियानात लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. पण जेव्हा तुम्ही उभं राहून एक पाऊल टाकता तेव्हा तुम्ही लठ्ठपणाला दूर पळवण्याकडे एक पाऊल टाकता हे समजून जावं.

बापरे! बर्फात गोठलेल्या मांजराला असं मिळालं नवं आयुष्य!

फणस खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील, एकदा जाणून घ्या!

पार्टनरच्या घोरण्याने तुम्ही त्रस्त आहात.. या घरगुती उपायांनी मिळवा आराम

तुम्ही नाइट शिफ्ट तर करत नाही ना.. कारण हा आजार होण्याची आहे सर्वाधिक शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या