लग्नावेळी मान्य केली एक अट आणि पुरता बरबाद झाला नवरा

लग्नावेळी मान्य केली एक अट आणि पुरता बरबाद झाला नवरा

लग्नाआधी बायकोची अट मान्य करून ती पूर्णही केली आणि आता नवऱ्याच्या डोक्याला चांगलाच ताप झाला आहे.

  • Share this:

चंदीगढ, 03 फेब्रुवारी : लग्न म्हटलं की अटी-शर्थी आल्याच. पण अशाच अटी मान्य करताना नीट विचार करावा. नाहीतर चांगलंच महागात पडू शकतं. आयुष्यभर त्याची किंमत मोजावी लागू शकते. असाच मोठा फटका बसला आहे तो पंजाबमधील एका व्यक्तीला. लग्नाआधी त्यानं एक अट मान्य केली आणि आता त्याच्या डोक्याला ताप झाला आहे.

पंजाबमधील (Punjab) एका व्यक्तीनं लग्नापासून परदेशात पाठवण्यापर्यंत बायकोचा संपूर्ण खर्च आपल्या खांद्यावर पेलला. तिच्यासाठी लाखो रुपये खर्च केले. आता त्याच बायकोनं आता त्याला ठेंगा दाखवला आहे. मोगामध्ये राहणाऱ्या तरुणानं बायकोला शिक्षणासाठी कॅनडाला पाठवलं. कॅनडाला पोहोचताच तिनं आपलं खरं रूप दाखवलं. कॅनडाला पोहोचताच दहा दिवसांनी तिच्या नवऱ्यानं तिला फोन केला आणि त्याला मोठा धक्का बसला.

देविंदर सिंह असं या व्यक्तीचं नाव आहे. तो दौधर सरकी गावातील आहे. त्याचं लग्न लुधियानातील मंडियानी गावातील हरजशनप्रीत कौरशी झालं होतं. ऑगस्ट 2018 मध्ये दोघांचंही लग्न झालं. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत देविंदर म्हणाला, हरजशनप्रीत आइलेट्स पास आहे आणि शिक्षणासाठी तिला परदेशात जायचं आहे, असं तिची मावशी आणि काकांनी सांगितलं होतं.

हे वाचा - SAVE THE DATE; अखेर तो क्षण आलाच, या दिवशी आदित्य-सईचं लग्न होणार

जर त्यानं तिच्याशी लग्न केलं तर तोदेखील परदेशात जाऊ शकतो पण लग्नापासून ते तिला परदेशात पाठवण्याचा पूर्ण खर्च त्यालाच उचलावा लागेल आणि याच अटीवर लग्न झालं. लग्नापासून बायकोला कॅनडा पाठवण्यापर्यंत सर्व खर्च देविंदरनं केला. तब्बल 31 लाख रुपये त्यानं खर्च केलं.

कॅनडाला पोहोचलेल्या बायकोला त्यानं फोन केला. तेव्हा तिनं फोनवर धमकावलं. पुन्हा फोन केला तर तुझ्याविरोधात केस करेन अशी धमकी तिनं दिली. त्यानंतर तो आपल्या सासरी गेला. तिथंही त्याच्यासोबत कुणीच चांगलं वागलं नाही.

हे वाचा - एक नव्हे 16 तरुणांना ओढले जाळ्यात, तरुणीकडे सापडले 15 लाखांपेक्षा जास्तीचे गिफ्ट

याप्रकरणी तरुणानं पत्नीसह तिच्या घरच्यांविरोधातही तक्रार दिली आहे. यामध्ये मुलीचे आई-वडील, मामा-मामी आणि मेहुणीचा समावेश आहे. बधनीकला पोलीस ठाण्यात तरुणानं 11 मार्च 2020  साली तक्रार दिली होती. 11 महिन्यांनंतर पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. हरजशनप्रीत कौर, तिचे वडील सुखविदर सिंह, आई हरप्रीत कौर, हरजीत सिंह सरबजीत कौर आणि अमनजोत कौर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.

Published by: Priya Lad
First published: February 3, 2021, 10:20 PM IST

ताज्या बातम्या