नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : नवरा दारू पिऊन घरी येऊन आपल्या बायकोला मारहाण करतो, अशा घटना आपल्या कानावर पडल्यात. बेवड्या नवऱ्याचा जाच आजही कित्येक महिला सहन करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एका महिलेने आपल्या दारूड्या पतीला चांगलीच अद्दल घडवली आहे.
ट्विटरवर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये या महिलेने एका खांबला आपल्या पतीला बांधून ठेवलं आहे. त्याचे हात आणि पाय तिने दोरीने बांधले आहेत आणि हातात भला मोठा दांडका घेईन ती त्याची धुलाई (Wife beat Husband) करते आहे.
व्हिडीओतील संवादानुसार आपल्या पत्नीशी खोटं बोलू तो बाहेर गेला आणि दारू ढोसून आला. त्यामुळे बायकोला राग अनावर झाला. तिने नवऱ्याला बांधून त्याची कपड्यासारखी धुलाई केली आहे.
@Ayravata या ट्विटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर मिळाल्याचं सांगितलं. जो त्याने ट्विटवर शेअर करताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे.. अनेक युझर्सनी हा व्हिडीओ लाइक करत शेअर केला आहे.
या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. अनेकांनी महिलेच्या या हिमतीला दाद दिली आहे. तर हा व्हिडीओ जितका मजेशीर आहे, तितक्याच मजेशीर कमेंटही काही जणांनी केला आहे.
ज्यांची पत्नी इतकी रागिष्ट असेल त्यांनी दारूच सोडून द्यावी, असा सल्ला काही युझर्सनी दिला आहे. बरं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही मद्यपी म्हणतील अशी पत्नी बाबा आपल्याला नको, मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल काही युझर्सनी तर आपल्याला अशीच बायको हवी, असं म्हटलं आहे.