दातासाठी मीठ घातकच, जाणून घ्या कारणं

दातासाठी मीठ घातकच, जाणून घ्या कारणं

खूप सोडियम असलेला कुठलाही पदार्थ दातांचं नुकसान करतो. बाजारात मिळणाऱ्या टुथपेस्टमध्ये फक्त मीठच नाही तर नारळाचं तेल, दालचिनी, बेकिंग सोडा इत्यादी पदार्थ भरपूर असतात.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : बाजारात अनेक टुथपेस्ट उपलब्ध आहेत. त्यातल्या बऱ्याच जाहिरात करत असतात की टुथपेस्टमध्ये असलेलं मीठ तुमच्या दातांसाठी उपयोगी आहे. पण हे पूर्ण चुकीचं आहे. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार मीठ दातासाठी हानिकारक आहे.

खूप सोडियम असलेला कुठलाही पदार्थ दातांचं नुकसान करतो. बाजारात मिळणाऱ्या टुथपेस्टमध्ये फक्त मीठच नाही तर नारळाचं तेल, दालचिनी, बेकिंग सोडा इत्यादी पदार्थ भरपूर असतात. हे मान्य आहे की या पदार्थांमुळे दात किडण्याची प्रक्रिया कमी होते. पण मीठ असलेली टुथपेस्ट दातांना नुकसान पोचवते.

मीठाची टुथपेस्ट आणि आहारात जास्त मीठ दोन्ही गोष्टी हानिकारक असतात.मीठामुळे ओरल हायजिन बिघडू शकतं.

ज्या पदार्थांमध्ये सोडियम भरपूर असतं, त्यात साखरही भरपूर असते. साखर तोंडाच्या आरोग्यासाठी नुकसान करते. तुम्हाला वाटतंय की मिठामुळे दात पांढरे शुभ्र होतात. तर ते चुकीचं आहे. मिठामुळे तोंडातले जंतू नष्ट होतात. तोंडात जंतू तयार होतच नाहीत. म्हणून अनेकदा घसा दुखत असेल, जंतूसंसर्ग झाला असेल तर डाॅक्टर मिठाच्या पाण्यानं गुळण्या करायला सांगतात.

दात मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी दोनदा ब्रश करायला हवा. मिठामुळे तोंडातली पीएच लेव्हल नियंत्रणात राहते. तरीही मिठाचा अति वापर हानिकारक आहे.

काही लोकांना सलाडवर वरून मीठ घालून खायची सवय असते. तसेच ताक, कोशिंबिर यावरदेखील वरून मीठ घातलं जातं. हे अत्यंत धोक्याचं आहे. असं केल्याने त्या पदार्थाचे सत्त्व निघून जाते. मीठ घालण्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता.

कामानिमित्त लोकांना ऑफीसला डबा न्यावा लागतो, आणि डब्यातील अन्न खराब होऊ नये यासाठी जास्त मीठ किंवा साखर घातली जाते. हे शरीरासाठी खूप घातक आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की जेवणात मीठाचे प्रमाण कमी असेल.

VIDEO: ज्वालामुखीचा असा उद्रेक तुम्ही कधीच पाहिला नसेल

First published: March 27, 2019, 2:15 PM IST

ताज्या बातम्या