News18 Lokmat

तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? ही असू शकतात 5 कारणं

तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं का? त्याकडे दुर्लक्ष करू नका. उन्हाळ्याच्या दिवसात थकवा येण्याची ही आहेत कारणं...

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 04:35 PM IST

तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? ही असू शकतात 5 कारणं

मुंबई, 11 एप्रिल : राज्यात यंदा उष्णतेचा पारा वेगानं वाढत आहे. उन्हाळ्यामुळे आपली ऊर्जा जास्त खर्च होते आणि आपल्याला थकवा जाणवतो. काही वेळा कामाच्या ठिकाणी आपल्याला सतत झोप येते किंवा आळस येतो. थकवा जाणवत असल्यानं काम करण्याची इच्छा होत नाही. काही महिलांमध्ये वर्षाचे 12 महिने थकवा जाणवण्याचं प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. थकवा येण्याची काय कारणं असू शकतात पाहा.

झोप पूर्ण न होणे

आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

पुरेसा व्यायाम न करणे

आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरातील पेशी अधिक चांगल काम करतात तुम्ही दिवसभर उत्साही आणि आनंदी राहता.

Loading...

आहारात प्रथिनांचं प्रमाण कमी असेल तर

तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.

साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा

साखरेचं प्रमाण अति असणारे गोड पदार्थ तुम्हा वारंवार खात राहिलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो. त्यामुळे दिवसभर मरगळलेले किंवा थकलेलं वाटू शकतं. साखरेचं प्रमाण कमी असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.

शरीरात लोहाची कमतरता असेल तर

आपल्या शरीरातील हिमोग्लोब्लीन किंवा रक्त कमी झालं तरीही आपण काहीही काम न करता आपल्याला दमल्यासारखं होतं. खूपदा डोकं दुखतं आणि चक्करही येते. त्यामुळे तुमच्या आहारात पालेभाज्या, हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी फळ, खाद्यपदार्थ खाणं आवश्यक आहे.

ताणतणाव

कामाच्या ठिकाणी किंवा घरातही काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकणं, चित्र कारणं, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते. ज्यामुळे तुम्हाला आलेला ताण कमी होईल. किंवा कामाच्या टेन्शनपासून काही वेळ स्वत:ला लांब ठेवा त्यामुळे तुमचा मूड फेश होईल आणि अधिक जोमानं काम करू शकाल.

व्यसन

कुठल्याही प्रकारचं अगदी मद्य-सिगरेटपासून ते चहा कॉफीपर्यंत कोणतही व्यसन तुमच्या मेंदू आणि शरीरासाठी हानीकारक आहे. त्यामुळे तुमची झोप बिघडू शकते. आणि दिवसभर थकवा असल्यासारखं तुम्हाला जाणवू शकतं. काही वेळा चहा कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे अॅसिडिटीचा त्रास होतो. सिगरेट-दारूमुळे आरोग्यावर परिणाम होतो.

आपला थकवा घालवण्यासाठी रोज किमान 12 ते 15 मिनिट मेडिटेशन करणं आवश्यक आहे. रोज भरपूर पाणी पिणे, व्यायाम आणि आहार या गोष्टींवर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला जाणवणारा थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते. अधिक चांगलं काम होण्यासाठी दिवसभर तुम्ही उत्साही आणि आनंदी असणं आवश्यक आहे.


VIDEO: देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं? यासाठी ही निवडणूक - मुख्यमंत्री


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...